महाराष्ट्रात ओबीसींच्या नव्या पक्षाची स्थापना होणार; प्रकाश शेंडगेंची मोठी घोषणा

महाराष्ट्रात ओबीसींच्या नव्या पक्षाची स्थापना होणार; प्रकाश शेंडगेंची मोठी घोषणा

मुंबई : मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद दिवसेंदिवस वाढतच आहे. सरकारने मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य करत सगेसोयरे अधिसूचना जारी केली. त्यानंतर तर ओबीसी नेते आणि संघटना अधिकच आक्रमक झाल्या आहेत. मराठा समाजानेही या अधिसुचनेचे कायद्यात रुपांतर होण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

अशात ओबीसी (OBC) नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी नवीन राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केली आहे. आरक्षणाची लढाई आता राजकीय लढाईवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे नवा पक्ष काढून लढणार असल्याचे त्यांनी घोषित केले आहे. मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. (OBC leader Prakash Shendge has announced the formation of a new political party.)

Narayan Rane : खासदाराचा सोपा प्रश्न पण, उत्तर देताना राणे गडबडले; राज्यसभेत नेमकं काय घडलं?

प्रकाश शेंडगे म्हणाले, महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचे तीन तेरा वाजताना आपण पाहत आहोत. मराठा समाजाने सत्तेच्या माध्यमातून सत्तेवर दबाव टाकून आमच्या आरक्षणाचा सत्यानाश केला आहे. ओबीसी समाजाची संख्या 60 ते 65 टक्के एवढी असताना सुद्धा सगळे खासदार मराठा, सगळे आमदार मराठा आहेत.

घटनेने अधिकार दिला असतानाही सत्तेचा वाटा आमच्यापर्यंत येऊ दिला नाही.त्यामुळे भटके विमुक्त, मागासवर्गीय समाज आणि सर्वांनी मिळून पुन्हा आपले राज्य आणायचे असे ठरले आहे. यासाठी राजकीय पक्ष काढण्याचा ठराव मंजूर झाला आहे. आरक्षणाची लढाई आता राजकीय लढाईवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे नवा पक्ष काढून लढणार आहे.

Rahul Gandhi : ‘इंडिया’चे सरकार आल्यास आरक्षणाची 50% मर्यादा काढणार; राहुल गांधींचा शब्द

या पक्षाचे नाव, कार्यकारिणी याबाबत लवकरच घोषणा करणार आहे. यासाठी 15 जणांची कमिटी नेमली आहे. आमच्याकडे सध्या पैसा नाही, पण, आमच्याकडे लोकशक्ती आहे. आमच्याकडे वोट बँक आहे, असे म्हणत शेंडगे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना इशारही दिला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज