Chhagan Bhujbal On Nashik Lok Sabha Constituency : सत्ताधारी महायुतीकडून (Mahayuti) नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये (Nashik Lok Sabha Constituency) कुणाला संधी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. काही दिवसापूर्वी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पत्रकार परिषद घेऊन नाशिक लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली होती.
छगन भुजबळ यांनी माघार घेतल्यानंतर महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र अद्याप उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा न झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. या जागेवरून सध्या शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
तर आता पुन्हा एकदा नाशिक मतदारसंघात नवीन ट्विस्ट आला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी या जागेवर राष्ट्रवादीचा दावा कायम असल्याचे सांगत 3 इच्छुक उमेदवारांची नावे सांगितली आहे. पत्रकारांशी बोलताना छगन भुजबळ यांनी नाशिक मतदारसंघात राष्ट्रवादीचा दावा कायम असून माजी खासदार देविदास पिंगळे, सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते निवृत्ती महाराज अरिंगळे हे नेते इच्छुक असल्याचे सांगितले.
अजित पवार गटाने पुन्हा एकदा नाशिक मतदारसंघात दावा केल्याने विद्यमान खासदार हेमंत गोडसे की दुसऱ्या कुणाला महायुतीकडून संधी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.
कोण आहेत इच्छुक उमेदवार ?
देविदास पिंगळे
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि मंत्री छगन भुजबळांचे अत्यंत विश्वासू माजी खासदार आणि नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देविदास पिंगळे यांचा नाशिक लोकसभा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे.
माणिकराव कोकाटे
गेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करून 1 लाख 35 हजार मते घेऊन चर्चेत आलेले सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे देखील पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करत आहे. माणिकराव कोकाटे हे सिन्नर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार असून शहरी भागात त्यांचा चांगला संपर्क आहे.
उद्धव ठाकरे काँग्रेसला तर राहुल गांधी करणार आपला मतदान, ‘हे’ आहे कारण
निवृत्ती महाराज अरिंगळे
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते निवृत्ती महाराज अरिंगळे यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा सुरु आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात त्यांचा चांगला संपर्क आहे. ते देवळाली व्यापारी बँकेचे अध्यक्ष देखील आहेत. यामुळे आता नाशिक लोकसभा मतदारसंघातून कुणाला संधी मिळणार हे पाहावे लागणार आहे.