Download App

Chhagan Bhujbal : ‘चौकशी कसली करता मला माहित नाही’; दमानियांच्या आरोपांवर भुजबळांच स्पष्ट उत्तर

Chhagan Bhujbal : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या संस्थांशी संबंधित गैरव्यवहारांची चौकशी कधी सुरू होणार?, भुजबळ यांच्यावरील आरोपांच्या चौकशीचं काय झालं?, विधिमंडळात दिलेल्या आश्वासनानुसार याबाबत फेरविचार याचिका सरकार कधी दाखल करणार? असे सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केले आहेत. त्यांच्या या सवालांवर खुद्द मंत्री छगन भुजबळ यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांनी अंजली दमानियांबाबत विचारले.

भुजबळ म्हणाले, चौकशी कसली करता मला काही माहिती नाही. महाराष्ट्र सदन केसमधून तर आम्ही डिस्चार्ज झालो आहोत. त्यांनी कसली मागणी केली आहे, याची मला कल्पना नाही. मुंबईच्या चॅरिटेबल ट्रस्टची कुठलीच केस नाही. जी आहे ती चॅरिटीकडे आहे. आधीचे जे ट्रस्टी आहेत त्यांनी केलेली केस आहे, असे उत्तर भुजबळ यांनी दिले.

Raj Thackeray : CM ठाण्याचे, लोकांचा आक्रोश त्यांना.. टोलदरवाढीवर राज ठाकरेंचा संताप

त्यांना मराठी फलक लावावेच लागतील

मुंबईतील घाटकोपर आणि अन्य काही भागात पुन्हा अन्य भाषांतील फलक दिसत असल्याचे पत्रकारांनी विचारले. त्यावर भुजबळ म्हणाले, शासनाचे आदेश आहेत. काही लोक कोर्टात गेले होते त्यावेळी कोर्टाने देखील सांगितलं होतं. तसेच शिवसेनेसह अन्य पक्षही मराठी फलकांबाबत मागणी करत असतात. काही ठिकाणी इंग्रजी आणि मराठी भाषेत फलक लावले होते. त्यानंतर त्यांना असं वाटलं असेल की आता लोकांचं दुर्लक्ष झालंय मराठीत नाही लावले तरी चालतील पण तसं नाही. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचं त्याकडं लक्ष असतंच आणि ते त्यानुसार मागणी करत असतात. आता दुकानदारांनाही हे करावंच लागेल. मराठी भाषेत त्यांना फलक लावावेच लागतील. दुकानांच्या पाट्या दुकानदारांना मराठीत कराव्याच लागतील. ज्या ठिकाणी दुसऱ्या भाषेतील फलक असतील काही लिहिलेलं असेल तर आधी त्यांना मराठीत लिहावं लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

भुजबळांनी राज ठाकरेंना सुनावलं

टोल आजिबात बंद होणार नाहीत, नितीन गडकरी यांनीच असं ठणकावून सांगितलं होतं. मुंबई आणि राष्ट्रीय महामार्गावरचे टोल बंद झालेले नाही असे भुजबळ म्हणाले. गडकरी साहेबांकडे ज्यावेळी लोक टोल बंद करा म्हणून मागणी घेऊन गेले तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की हे अजिबात होणार नाही. टोलशिवाय रस्ते होणार नाहीत, असे खुद्द केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते अशी आठवण भुजबळांनी यावेळी सांगितली.

Chhagan Bhujbal : टोलचा वाद पेटला! गडकरींचा किस्सा सांगत भुजबळांनी राज ठाकरेंना सुनावलं

Tags

follow us