Chhagan Bhujbal : टोलचा वाद पेटला! गडकरींचा किस्सा सांगत भुजबळांनी राज ठाकरेंना सुनावलं

Chhagan Bhujbal : टोलचा वाद पेटला! गडकरींचा किस्सा सांगत भुजबळांनी राज ठाकरेंना सुनावलं

Chhagan Bhujbal : राज्यातील टोल दरवाढीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा आक्रमक भुमिका घेतली आहे. टोल दरवाढीच्या निषेधार्थ मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सुरू केलेले उपोषण आज राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भेट दिल्यानंतर मागे घेतले. त्यानंतर राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. रस्ते नीट बांधता येत नसतील तर टोल कशाला वसूल करता? असा सवाल त्यांनी केला होता. त्यानंतर आता राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.

भुजबळ यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना टोलबाबत प्रश्न विचारला त्यावर भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. टोल आजिबात बंद होणार नाहीत, नितीन गडकरी यांनीच असं ठणकावून सांगितलं होतं. मुंबई आणि राष्ट्रीय महामार्गावरचे टोल बंद झालेले नाही असे भुजबळ म्हणाले. गडकरी साहेबांकडे ज्यावेळी लोक टोल बंद करा म्हणून मागणी घेऊन गेले तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की हे अजिबात होणार नाही. टोलशिवाय रस्ते होणार नाहीत, असे खुद्द केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते अशी आठवण भुजबळांनी यावेळी सांगितली.

अमित शहांपर्यंत गेलेला भाजप-शिवसेनेतील वाद; कारण ठरलेल्या ‘त्या’ पोलीस निरीक्षकांची अखेर बदली!

रस्ते करता येत नसतील तर टोल कशाला ? – राज ठाकरे

टोलच्या दरवाढीविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Raj Thackeray) मैदानात उतरली असून ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव मागील चार दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. ठाण्यातील आनंदनगर टोलनाका (Toll Rate ) परिसरात त्यांनी उपोषण सुरू केले होते. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे येऊन भेट दिल्यानंतर जाधव यांनी उपोषण मागे घेतले.

यावेळी राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. राज ठाकरे म्हणाले, रस्ते नीट बांधले जाणार नसतील तर टोल कशाला वसूल करता? टोलवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखल केलेली याचिका का मागे घेतली? कुणाच्या सांगण्यावरून घेतली? असे सवाल त्यांनी केले. मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत. निवडणुका तोंडावर आल्यात. लोकांचा आक्रोश त्यांना परवडणारा नाही, असा इशारा ठाकरे यांनी दिला.

Raj Thackeray : CM ठाण्याचे, लोकांचा आक्रोश त्यांना.. टोलदरवाढीवर राज ठाकरेंचा संताप

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube