Download App

शरद पवारांच्या फोटोचं ‘पॉलिटिक्स’ जोरात; भुजबळांना आठवले पवारांचे ‘ते’ जुने शब्द

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही अजित पवार गटाकडून शरद पवार (Sharad Pawar) यांच्या फोटोचा वापर केला जात आहे. त्यावरून अनेकदा दोन्ही गटाने एकमेकांवर टीका केली आहे. माझा फोटो वापरल्यास न्यायालयात खेचण्याचाही इशारा शरद पवार यांनी दिला होता. तरी देखील काहीच फरक पडला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे प्रतोद व मदत व पुनवर्सन मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी शरद पवार यांचा फोटो लावणारच अशी भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर आता राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवारांचा फोटो लावणारच, अजित पवार गटाची ठाम भूमिका

भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, ‘कुणीतरी आदराने फोटो लावला म्हणून कोर्टात गेलेलं कुणाला आजपर्यंत तरी पाहिलेलं नाही. बॅनरवर फोटो वापरल्यास ते कोर्टात जाणार आहेत असं वाचलं. पण, सुरुवातीच्या काळात शरद पवार स्वतः म्हणाले होते की मी कोर्टबाजी करणार नाही. आता फोटोवरून ते कोर्टात जाणार असं म्हणाले. पण, फोटोची विटंबना झाली म्हणून कोर्टात गेलेली अनेक उदाहरणं आहेत. परंतु, कुणीतरी आदराने आपला फोटो लावला म्हणून कुणी कोर्टात गेलंय, असं उदाहरण मी पाहिलेलं नाही.’

..तरीही अजितदादांचे शिलेदार ऐकत नाहीत

दरम्यान, गुरुवारी बीडमध्ये शरद पवार यांची जाहीर सभा झाली. या सभेआधी बीड शहरात अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले होते. त्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो होता. त्याच दिवशी शिर्डी (जि. नगर) येथे राज्य सरकारचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होता.  या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या समर्थकांनी कार्यक्रमस्थळी स्वागताचा बॅनर लावला होता. या बॅनरवर तर शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो शेजारीच होते. शरद पवार यांच्याकडून त्यांचा फोटो वापरण्यास विरोध केला जात असला तरी अजित पवार गटाचे नेते मात्र त्यांचा फोटो लावण्याची एकही संधी सोडत नाहीत.

अजितदादांचे शिलेदार काही ऐकेनात; आता पवार-मोदींच्याच बॅनरची शिर्डीत ‘हवा’

Tags

follow us