अजितदादांचे शिलेदार काही ऐकेनात; आता पवार-मोदींच्याच बॅनरची शिर्डीत ‘हवा’

अजितदादांचे शिलेदार काही ऐकेनात; आता पवार-मोदींच्याच बॅनरची शिर्डीत ‘हवा’

Shirdi News : ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम आज शिर्डीमधील काकडी येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रशासनाकडून मोठी जय्यत तयारी करण्यात आली. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उत्साही कार्यकर्त्यांकडून देखील बॅनरबाजी करण्यात येत आहे. यातच एका बॅनरची सध्या चर्चा रंगली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या स्वागतच्या एका बॅनरवर नरेंद्र मोदी (Narendra Modi) व शरद पवार (Sharad Pawar) हे एकत्र झळकले आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले असून हे बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

फोटोवरून राजकारण तापलं; काका-पुतण्याच्या वादात राऊतांनी राज ठाकरेंनाही ओढलं

शिर्डी येथील काकडी येथे आज ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या नियोजित कार्यक्रमासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मोठा मंडप तसेच लाभार्थ्यांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून काम सुरु होते. प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींचे कार्यकर्ते देखील या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करत होते. यातच सध्या आमदार आशुतोष काळे यांच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात आलेला एक बॅनर चांगलाच चर्चेत आहे.

नेमकं काय आहे बॅनरवर?

या कार्यक्रम स्थळी जे बॅनर लावण्यात आलेले आहेत. यावर एका बाजूला अजित पवार यांचा मोठा फोटो आहे तर दुसऱ्या बाजूला आमदार आशुतोष काळे यांचा फोटो आहे. तर मध्यभागी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांना शुभेच्छा देत असल्याचा आशय आहे. तसेच या बॅनरवर वरच्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो लावलेला पाहायला मिळत आहे.

Chandrashekhat Bavankule : राजकीय अस्तित्त्व अन् पक्ष टिकवण्यासाठी पवारांची मोदींवर टीका

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले होते की माझ्या परवानगीशिवाय माझा फोटो वापल्यास न्यायालयात खेचले जाईल. मात्र तरीही अजित पवार गटाचे नेते ऐकण्याच्या मनस्थितत नाहीत. आज बीडमध्ये शरद पवार यांची सभा होणार आहे. येथेही धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले आहेत. या बॅनरवर शरद पवार आणि अजित पवार यांचे फोटो आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube