Download App

छत्रपती संभाजीराजेनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात

  • Written By: Last Updated:

गेल्या काही दिवसापासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. त्याच पार्शभूमीवर स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. त्यामुळे नव्या राजकीय चर्चा सुरु आल्या आहेत. दरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये तब्ब्ल दोन तास चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे.

छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून याची माहिती दिली आहे. त्यांनी लिहलं आहे की, “आज पुणे येथे ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. महाराष्ट्रात सुरू असलेले सद्यस्थितीचे राजकारण व राज्यासमोर असलेल्या समस्या, जनतेच्या गरजा – अपेक्षा यांबाबत सविस्तर चर्चा झाली.”

अजितदादांच्या उत्तराने सभागृहात एकच हश्या; म्हणाले मी भटक्या कुत्र्यांचं…

दरम्यान आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत स्वराज्य पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभा करणार असल्याची घोषणा छत्रपती संभाजीराजेंनी केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीला अजून बराच कालावधी असला तरी संभाजीराजेंनी मात्र रणशिंग फुकले आहे. परळीमध्ये माधवराव जाधव यांच्या मित्र मंडळ कार्यालयाच्या उद्घाटनासाठी संभाजीराजे आले होते. यादरम्यान त्यांनी सरकारवर देखील सडकून टीका केली आहे.

Tanaji Sawant : आरोग्य मंत्र्यांचा मोठा दावा; सध्याची कोरोनाची लाट 15 मे पर्यंत ओसरणार

बीड जिल्हातील परळी शहरात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांना संभाजीराजे परळी मतदारसंघातून उमेदवार देणार का? असा प्रश्न विचारला त्यावर बोलताना ते म्हणाले की, “आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत स्वराज्य पक्ष परळीसह संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभा करणार आहे.”

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, 2024 मध्ये स्वराज्य पक्ष हा कुठल्याही परिस्थितीत राजकारणात येणार असून प्रत्येक ठिकाणी उमेदवार उभा करणार आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी स्वराज्य पक्ष कटीबद्ध असल्याचे त्यांनी सांगितलं.

Tags

follow us