CA Student Ends Life Leaks Gas Cylinder With Scissor : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. ज्यामुळे शहर हादरलं आहे. जवाहरनगर येथील न्यू शांतिनिकेतन कॉलनीत ही (Crime News) घटना घडली, जिथे विस वर्षांचा महाविद्यालयीन विद्यार्थी ओम संजय राठोड याने गॅस सिलिंडरमध्ये कात्री खुपसून आपले जीवन (CA Student Ends Life) संपवले.
घटना नेमकी कशी घडली?
प्राथमिक तपासानुसार, ओम हा CA परीक्षेची तयारी करत होता. महाविद्यालयातून परतल्यावर त्याने घराचे दार बंद करून पंख्याला साडी लावून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न फसल्यावर त्याने गॅस सिलिंडरमध्ये कात्री खुपसून त्याचा स्फोट केला, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. आग झाल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि आग नियंत्रणात आणली. ओमला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेच्या नोंदीसाठी जवाहरनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वराह जयंती 2025 : पौराणिक कथा, तारीख, महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी, सगळं काही घ्या जाणून…
गॅस सिलिंडरमध्ये कात्री खुपसली
ओम राठोड बंबाट नगर येथे राहत होता. इयत्ता दहावीमध्ये त्याला 93 टक्के गुण मिळाले होते आणि पुढील CA अभ्यासासाठी तो मेहनत करत होता. काही दिवसांपूर्वीच त्याची आई व बहीण त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. घरात ते वडिलांसोबत होता.
घटनेच्या दिवशी, ओम चार्जर विसरल्याचे सांगून काकाच्या घरी गेला होता. काकू काही वेळ बाहेर गेली असताना, त्याने घरातच गॅस सिलिंडरमध्ये कात्री खुपसून त्यात स्फोट केला. शेजाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण प्रचंड उष्णतेमुळे ओमचा मृत्यू झाला. अग्निशमन विभागानुसार, किचनमधील सिलिंडर रुग्णालयातील रेग्युलेटरच्या जागी गॅस लीक होईल यासाठी कात्री खुपसली होती, तसेच दारं आणि खिडक्या बंद केल्या होत्या.
भारत-रशियाची मोठी डील! ऊर्जा करारावर शिक्कामोर्तब, ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला चकवा?
शेजाऱ्यांच्या आणि कुटुंबीयांच्या प्रतिक्रिया
परिसरातील नागरिक या घटनेमुळे हादरले आहेत. कुटुंबीय आणि शेजारी या आत्महत्येची कारणं समजू शकलेले नाहीत. तपास सुरू असून, पोलीस आणि अग्निशमन विभागाने घटनेचा सखोल आढावा घेतला आहे.