आपण कधीतरी थांबायचं का? असा प्रश्न माझ्या मनात.., मंत्री संजय शिरसाटांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत

शेवटी माणसाचे वय हे त्याला काही कारणाने थांबायला भाग पाडतं. अशा शब्दात मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

News Photo (61)

News Photo (61)

संजय शिरसाट हा अल्पसंतुष्ट माणूस आहे. हे पण पाहिजे, ते पण पाहिजे अशा प्रकारचे मला कधीच भूक नव्हती, ना असेल. मी दहा वर्ष नगरसेवक होतो. वीस वर्षे मी आमदार आहे. ज्याचे कधी आपण स्वप्न पाहिले नाही ते सर्व स्वप्न आपण भोगलेले आहेत. (Shirsat)  शेवटी माणसाचे वय हे त्याला काही कारणाने थांबायला भाग पाडतं. अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत.

आपण कधीतरी थांबायचं का? असा प्रश्न माझ्या मनात आला. रोजची धावपळ आणि दगदग करण्यापेक्षा कधीतरी थांबायचं का? मी मनाशी ठरवण्याचा प्रयत्न करत आहे की थांबलं पाहिजे असंही शिरसाट म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानाने राजकारणात चर्चांना उधान आलं आहे. तसंच, यासाठी कुणाचा राजकीय दबाव, कोणी बोलत आहे किंवा वैतागून मी काही बोलत आहे अशातला काहीच भाग नाही असंही ते म्हणाले.

5 हजार कोटींचा सिडको घोटाळा! शिरसाट राजीनामा द्या; बॅगभर पुरावे, पेनड्राईव्हसह रोहित पवारांचा हल्लाबोल

मी आता 64 वर्षांचा आहे. लवकरच मी 65 व्या वर्षात पदार्पण करणार आहे. स्वप्न पाहायला आपण काहीही पाहू शकतो. मला 2029 पर्यंतचा काळ आहे. 2029 साली मी 69 वर्षांचा होईल. त्यावेळेस काय करावं याचा विचार तर केलाच पाहिजे ना? राजकारण हा सेवेची संधी असलेला भाग जरी असला तरी आता माझ्याकडं असलेलं खातं मोठं आहे. मी चांगलं काम करत आहे. त्यामुळे मला आणखीन काहीतरी पाहिजे किंवा माझ्या काही अपेक्षा आहेत असं काही नाही. माझ्याकडे जे आहे त्यात मी समाधानी आहे, असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नवी मुंबईतील सिडकोच्या 5 हजार कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याप्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा सरकारवर सडकून टीका केली. मलिदा गँगचे मास्टरमाईंड मंत्री संजय शिरसाटांचा राजीनामा घेऊन सरकारची उरलीसुरली विश्वासार्हता वाचवा, असं त्यांनी म्हटलं आहे. याबाबत संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे. सर्व पुरावे सिडको अधिकाऱ्यांकडे द्या. तुम्ही ज्यांच्यासोबत फिरता त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

बिवलकर यांच्या प्रश्नाला सामोरे जा. बिवलकर यांनी SIT मागणी केली. ज्यांची दलाली करता त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे. आपल्यावर टीका होत असल्याने त्यांनी हे केलं आहे. सिडकोने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आरोप करणारे मूर्ख लोक आहेत. बेछूट आरोप करून त्या व्यक्तीला ब्लॅकमेल करून जमीन बळकावण्याचा यांचा प्रयत्न आहे, असा घणाघात शिरसाट यांनी यावेळी केला.

Exit mobile version