भाजप नेते नितेश राणेंचा छत्रपती संभाजीनगरमध्ये खान की बाण’चा प्रचार; म्हणाले, हिंदू समाजाने…

छत्रपती संभाजीनगरकडे वाकड्या नजरने पाहण्यासाठीच रशीद खान यास उमेदवार म्हणून उभे केले आहे असंही राणे म्हणाले आहेत.

News Photo   2026 01 12T152942.957

News Photo 2026 01 12T152942.957

खानला थांबवायचं असेल तर आता बाणची गरज नाही. (Election) भाजपच्या भगव्याच्या शानच कामाला येणार, असं विधान भाजप मंत्री नितेश राणे यांनी केलं. छत्रपती संभाजीनगरच्या महापालिका निवडणुकीमध्ये हिंदू समाजाने एकजुट दाखवावी, असं आवाहन करत हिंदू राष्टात आम्ही हिंदूचे हित प्रथम बघणार, असंही ते म्हणाले. महापालिका पालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ मंत्री राणे यांची गुलमंडी येथे रविवारी रात्री जाहीर सभा झाली.

ही निवडणून खान विरुद्ध बाण विरुद्ध भगव्याची शान अशा नजरेतून पाहिली पाहिजे. छत्रपती संभाजीनगरकडे वाकड्या नजरने पाहण्यासाठीच रशीद खान यास उमेदवार म्हणून उभे केले आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांना पक्षात घेत असताना बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र पाठिमागे होते. हे दृश्य पाहिल्यावर लाज वाटली.

ब्रेकिंग : झेडपीच्या निवडणुकांना पुन्हा ब्रेक; सुप्रीम कोर्टाकडून राज्य निवडणूक आयोगाची मागणी मान्य

रशीद खान यास केवळ नगरसेवक होण्यासाठी उमेदवारी दिली नाही. त्यामागील षडयंत्र समजून घेतले पाहिजे. शिवसेनेने समान नागरी कायद्यासाठी काढलेल्या मोर्चाला , हिंंदूह्रदयसम्नाट बाळासाहेब ठाकरे यांना विरोध करणारा हाच व्यक्ती होताआणि उद्धव ठाकरे यांनी त्याच व्यक्तीला उमेदवारी दिली, असा आरोपही मंत्री राणे यांनी केला.

बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. उद्धव ठाकरे हे अडीच वर्ष राज्यात सत्तेत होते. त्यांनी या शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर का केले नाही, असा सवालही त्यांनी करत फडणवीस मुख्यमंत्री होताच त्यांनी शहराचे नाव बदण्याचा निर्णय घेतल्याचे नमूद केले. शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असे नामकरण केल्यापासून काही लोक खूप अस्वस्थ झाले आहेत. पुन्हा औरंगाबाद नाव व्हावे, यासाठी षडयंत्र आखले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

तर खासदार डॉ. कराड म्हणाले की, यापूर्वी औरंगाबादचे महापौर होते आता आपणास छत्रपती संभाजीनगराचा महापौर करायचा आहे. त्यासाठी भाजपला साथी द्या, असे आवाहन त्यांनी करत पाणी पुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच रोज मुबलक पाणी मिळेल, ’असा विश्वासही व्यक्त केला.

Exit mobile version