Download App

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचे अन् मुलींच्या नूतन वसतीगृहाचे उद्घाटन

Devendra Fadnavis : आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. आज त्यांच्या हस्ते शासकीय

Devendra Fadnavis : आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. आज त्यांच्या हस्ते शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीचे आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनचे वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पीटलच्या ‘सिंधू’ वसतीगृहाचे उद्घाटन करण्यात आले आहे. या नूतन वसतिगृहात 600 मुलींच्या राहण्याची क्षमता आहे. यावेळी शासकीय विश्रामगृह सर्व सोयीसुविधांसह सज्ज ठेवावे, असे निर्देश त्यांनी दिले.

कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) , जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) , महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) , सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी शासकीय विश्रामगृहाच्या नवीन इमारतीची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, अहिल्यानगर शहरात ही एक देखणी वास्तू निर्माण झाली आहे. या ठिकाणचा परिसर स्वच्छ ठेवावा आणि इमारतीची देखभाल योग्य करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

असे आहे नवीन शासकीय विश्रामगृह

अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहाचे विस्तारीकरण करण्यात आले असून या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यात आली आहे. यासाठी 6 कोटी 75 लाख रुपये खर्च आला. यामध्ये तळमजल्यावर 2 व्हीव्हीआयपी कक्ष, 1 व्हीआयपी कक्ष, भोजन कक्ष, बैठक कक्ष, स्वयंपाकगृह, भांडार, स्वागत कक्ष आहेत. पहिल्या मजल्यावर 2 व्हीव्हीआयपी व 3 व्हीआयपी कक्ष असून 75 व्यक्तींची क्षमता असलेले सभागृहही उभारण्यात आले आहे. अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता इमारतीचे भूमिपूजन अहिल्यानगर येथील बांधकाम भवन येथे अधीक्षक अभियंता कार्यालय, कार्यकारी अभियंता व उप अभियंता कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

मोठी बातमी! भारत उद्या करणार पाकिस्तान सीमेजवळ हवाई सराव, नोटम जारी

13 कोटी 31 लक्ष 42 हजार 838 रुपये खर्च करुन उभारण्यात येत असलेली ही इमारत सर्व सुविधांनी युक्त आहे. पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर कार्यकारी अभियंता कार्यालय, उपविभागीय कार्यालय असून तिसऱ्या मजल्यावर अधीक्षक अभियंता कार्यालय, बैठक कक्ष, सभागृह, अभिलेख कक्ष उभारण्यात येणार आहे.

follow us