मोठी बातमी! भारत उद्या करणार पाकिस्तान सीमेजवळ हवाई सराव, नोटम जारी

मोठी बातमी! भारत उद्या करणार पाकिस्तान सीमेजवळ हवाई सराव, नोटम जारी

NOTAM: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) भारत आणि पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan) तणाव वाढत असून भारत कधीही पाकिस्तानवर लष्करी कारवाई करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, भारत 7 आणि 8 मे रोजी भारत-पाक सीमेच्या दक्षिण भागात हवाई सराव करणार आहे. यासाठी नोटम (NOTAM) देखील जारी करण्यात आला आहे.

नोटम म्हणजे हवाई दलाच्या जवानांना हवाई क्षेत्रात कोणत्याही तात्पुरत्या निर्बंधांची किंवा धोक्यांची माहिती देणारी सूचना असते. पाकिस्तानसबोत वाढणाऱ्या तणावात उद्या भारताकडून आपली ताकद दाखवली जाणार आहे. माहितीनुसार, हा सराव भारताच्या नियमित ऑपरेशनल रेडिनेस सरावांचा एक भाग आहे, ज्यामध्ये आयएएफ राजस्थानमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर युद्धाभ्यास करेल. जारी करण्यात आलेल्या नोटमनुसार,  हा सराव 7 मे रोजी रात्री 9.30 वाजता सुरू होईल आणि 8 मे रोजी पहाटे 3.00  वाजेपर्यंत चालेल. बाधित भागात कोणतेही विमान किंवा ड्रोन उडवण्यास बंदी असेल. नोटम दरम्यान भारतीय हवाई दलाची लढाऊ विमाने आणि देखरेख विमाने युद्धाभ्यास करतील.

22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दशतवादी हल्ल्यात 26  पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. तर दुसरीकडे या हल्ल्या पाठीमागे पाकिस्तानचा हात असल्याची माहिती भारत सरकारला मिळाली आहे.

100 दिवस झाले, आता 150 दिवसांचा दुसरा कार्यक्रम : मुख्यमंत्री फडणवीसांची चौंडीत मोठी घोषणा

पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. भारताने पाकिस्तासोबत असणारा सिंधू जल करार देखील रद्द केला आहे. तसेच भारतात राहणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना देशातून बाहेर काढले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube