मोठी बातमी! पहलगाममध्ये सुरक्षा दलांकडून एका संशयिताला अटक; बुलेटप्रुफ जॅकेट घालून फिरत होता

India Pakistan Tension : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान (India Pakistan Tension) यांच्यातील तणाव प्रचंड वाढला आहे. कधीही युद्धाचा भडका उडेल अशी परिस्थिती आहे. भारतीय सेना अलर्ट मोडवर आहे. यातच एक महत्वाची बातमी हाती आली आहे. भारतीय सुरक्षा दलांनी बैसारन भागात एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या संशयित व्यक्तीने बुलेटप्रुफ जॅकेटचे कव्हर परिधान केले होते. यामुळे सुरक्षा दलाच्या जवानांना त्याच्यावर संशय आला. या व्यक्तीला तत्काळ ताब्यात घेण्यात आले. या व्यक्तीची चौकशी सुरू करण्यात आली आहे. परिसरात सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवण्यात आली आहे. सर्च ऑपरेशन वेगात सुरू करण्यात आले आहे.
नागरिकांनी सतर्क राहावे तसेच कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळून आल्यास त्याची तत्काळ माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. या घडामोडीनंतर पहलगाममध्ये खळबळ उडाली आहे. अतिरेक्यांची शोध मोहीम अधिक वेगाने सुरू करण्यात आली आहे. स्थानिकांच्या मदतीशिवाय अतिरेकी इतका मोठा हल्ला करू शकत नाही असे भारतीय सुरक्षा यंत्रणांचे मत आहे. त्यामुळे या भागातील अनेक लोकांची चौकशी करण्यात येत आहे.
पाकिस्तानचा मोठा निर्णय, डिफेन्स बजेटमध्ये केली 18 टक्यांनी वाढ; जूनमध्ये येणार बजेट
दरम्यान, आज सकाळी भारतीय सैन्याने (Indian Army) येथील पूंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरुन (LOC) एका पाकिस्तानी नागरिकाला अटक केली. हा पाकिस्तानी भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्न करत होता की आणखी काही कारणाने येथे दाखल झाला याची माहिती अद्याप स्पष्ट नाही. आता या व्यक्तीची कसून चौकशी करण्यात येत आहे.
सेना आणि सुरक्षा यंत्रणा या घटनेची सविस्तर चौकशी करत आहेत. चौकशीतून जी माहिती हाती येईल त्यानुसार पुढील कारवाईची दिशा निश्चित होणार आहे. या घटनेनंतर एलओसीवर अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. जेणेकरून कोणत्याही घुसखोरीची घटना हाणून पाडता येईल. पहलगाम हल्ल्यानंतर येथील परिस्थिती अतिशय संवेदनशील झाली आहे. दोन्ही देशांतील तणाव प्रचंड वाढला आहे.
भारत पाकिस्तान तणाव वाढला
पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव प्रचंड वाढला आहे. वाढलेला तणाव पाहता पाकिस्तानने सीमेजवळ नवीन डेपो तयार करण्याचे काम सुरू केले आहे. पण दारूगोळच नाही तर अशा डेपोंचे कोणतेही रणनितिक महत्व नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे. पाकिस्तानने त्यांच्याकडील हत्यारे दुसऱ्या देशांना दिली आणि आता स्वतः कंगाल झाला आहे. आर्थिक फायदा होण्यासाठी हा निर्णय घेतला गेला होता पण या निर्णयामुळे पाकिस्तानचे दीर्घकालीन रणनितिक नुकसान झाले आहे.
मास्टरस्ट्रोक ठरला तोट्याचा! भारताची विमानं बंद, पाकिस्तानला दररोज अडीच कोटींचा फटका