Download App

मुख्यमंत्री म्हणाले… म्हणून श्रीमंतांच्या यादीत माझे नाव येणार नाही, मात्र…

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज सभागृहात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधत कडाडून टीका केली आहे. विरोधकांकडून उपस्थित केला जाणारा दिल्ली दौऱ्यावरून शिंदे म्हणाले, मी सामान्य कार्यकर्ता आहे म्हणून मी लोकांमध्ये जातो. मी एक सामान्य कार्यकर्ता असून कार्यकर्ताच राहणार. सत्तेची हवा कधीही माझ्या डोक्यात जाणार नाही. तसेच माझं नाव कधीही श्रीमंतांच्या यादीत येणार नाही, मात्र माणुसकीच्या यादीत माझं नाव येईल अशा शब्दात शिंदे यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे.

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बोलताना शिंदे यांनी विविध विषयांवर भाष्य केले. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा हा नेहमीच चर्चेत राहत असायचा. यातच सातत्याने होणाऱ्या दिल्लीवारी वरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात विरोधकांना उत्तर दिले आहे.

अहमदनगर शहरातील मस्जिदीच्या जागांवर अतिक्रमण होतंय…अबू आझमींनी उपस्थित केला सवाल

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, विरोधक माझ्या दिल्लीवारीवर देखील भाष्य करतात. पूर्ण वेळ फिरायला वेळ कमी पडतो म्हणून तुम्ही दिल्लीवारी करतात. पण मी माणसातला आहे, लोकांमध्ये जातो. सर्वसामान्य माणूस आहे, मी आजही सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि कार्यकर्ता म्हणूनच काम करणार. माझ्या डोक्यात कधीही सत्तेची हवा जाणार नाही. माझे पाय हे नेहमीच जमिनीवर राहणार असे शिंदे यावेळी बोलताना म्हणाले आहे.

उत्तर ऐकण्यापूर्वी विरोधकांनी पळ काढला, मुख्यमंत्री म्हणाले…

विरोधक म्हणू लागले की, आता केंद्रातील नेतेमंडळी राज्यात येऊ लागले पण तुम्हाला कोणी अडवलं होत असा सवाल यावेळी शिंदे यांनी केला. तसेच पुढे बोलताना शिंदे म्हणाले, राज्याच्या हितासाठी दिल्लीला जावं लागत, नेत्यांना, अधिकाऱ्यांना, पंतप्रधान मोदींना भेटावं लागत. आम्ही जातो म्हणून हजारो कोटी या राज्याच्या विकासासाठी आपल्याला मिळाले आहे. तुमच्यासारखे आम्ही कडकसिंग झाली असतो तर रुपया मिळाला नसता अशा शब्दात शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

Tags

follow us