उत्तर ऐकण्यापूर्वी विरोधकांनी पळ काढला, मुख्यमंत्री म्हणाले…

उत्तर ऐकण्यापूर्वी विरोधकांनी पळ काढला, मुख्यमंत्री म्हणाले…

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांना सत्ताधारी पक्षातील मंत्री मंडळींनी उत्तर दिले आहे. यातच आज या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना खोचक टोला लगावला आहे. अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्याचा अधिकार जसा विरोधी पक्षाचा असतो तसा उत्तर देण्याचा अधिकार सत्ताधाऱ्यांचा असतो. माझी अपेक्षा होती की विरोधी पक्षाचे नेते उत्तर ऐकण्यास हजर राहतील , मात्र विरोधकांनी पळ काढला. ऐकण्याचे धाडस विरोधकांमध्ये नाही असा खोचक टोला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.

आज विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, या सभागृहात लोकप्रतिनिधी आपले प्रश्न मांडतात. त्याची उत्तरे त्यांना मिळाल्याने त्यांचे समाधान होते. मात्र अनेक जण केवळ बाहेर पायऱ्यांवर बसून काहीतरी स्टंट करायचा म्हणून स्टंट करतात. अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. ‘

राहुल गांधी प्रकरणाचे विधानसभेत पडसाद: महाविकास आघाडीचा बहिष्कार

गेली अनेक दिवस आपण पहिले तर विरोधकांकडे महत्वाचे मुद्दे नाही. त्यामुळे ते असे स्टंट करतात. यावेळी बोलताना त्यांनी सावरकरांच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांच्यावर देखील निशाणा साधला. शिंदे म्हणाले, राहुल गांधी यांनी वारंवार सावरकरांचा अपमान केला आहे. सावरकर हे केवळ महाराष्ट्राचे नाही तर ते देशाचे दैवत आहे. त्यांनी देशासाठी हाल सहन केले. सावरकर ज्या जेलमध्ये राहिले त्या जेलमध्ये एक दिवस राहुल गांधी यांनी राहावे तेव्हा त्यांना कळेल की त्यांनी किती यातना सहन केल्या अशा शब्दात यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर देखील कडाडून टीका केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube