अहमदनगर शहरातील मस्जिदीच्या जागांवर अतिक्रमण होतंय…अबू आझमींनी उपस्थित केला सवाल

अहमदनगर शहरातील मस्जिदीच्या जागांवर अतिक्रमण होतंय…अबू आझमींनी उपस्थित केला सवाल

अहमदनगर : नगर शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या मस्जिदीच्या जागांवर पोलीस स्टेशन, व्यावसायिक इमारती उभारण्यात आलेल्या आहे. तसेच या मस्जिद मध्ये अनेकांकडून गैरप्रकार केला जातो आहे. यामुळे येथील सुरक्षितता धोक्यात आली आहे, असे प्रतिपादन सपाचे नेते अबू आझमी यांनी सभागृहात केले. तसेच याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे देखील ते म्हणाले. यावर शिंदे गटाचे आमदार शंभूराज देसाई यांनी उत्तर दिले आहे.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. दरम्यान सभागृहात अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा सुरु आहे. यातच अबू आझमी यांनी अल्पसंख्यांकांचा एक महत्वाचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. यावेळी बोलताना अबू आझमी म्हणाले, नगर शहरातील दो बोटी चिरा मस्जिद, हुसैनी मस्जिद यांसह अनेक मस्जिदींवर काही ठिकाणी पोलीस स्टेशन बनले आहे. तर काही ठिकाणी कोतवाली तसेच काही ठिकाणी व्यावसायिक इमारती बनल्या आहेत.

तसेच हुसैनी मस्जिदच्या जागेवर हायकोर्टाने पोलीस अधीक्षक कार्यालय बनवण्याचे आदेश दिले. तिथे तीन मजली इमारत देखील बनली आहे. मात्र पर्यायी जागा अद्याप मिळालेली नाही आहे. आमच्या अनेक ठिकाणच्या मस्जिदींवर अतिक्रमण केले जात आहे. आम्ही अल्पसंख्यांक आहोत. बीबीका मकबराच्या ठिकाणी देखील आमचे मंदिर आहे असे काहीजण म्हणत आहे.

आमच्या ज्या काही मस्जिदी आहे ज्यांच्यावर अतिक्रमण केले जात आहे त्या जमिनी संबंधित ट्रस्टच्या ताब्यात देण्यात याव्या अशी मागणी यावेळी अबू आझमी यांनी केली आहे. आमच्या समाजात नमाज घरात पढणे यास मनाई आहे यासाठी ती मस्जिदमध्ये पढावी लागते मात्र इथे आधीच मस्जिदी कमी आहेत. ज्या मस्जिदींवर अतिक्रमण केले आहे त्या खाली करण्यात याव्या अशी मागणी अबू आझमी यांनी केली आहे.

बिबिका मकबरीमध्ये नमाज पढण्याची परवानगी द्यावी
घरामध्ये नमाज पढण्यास मनाई असल्याने आम्ही मस्जिदमध्ये नमाज पढतो. मात्र बिबिका मकबरामध्ये अनेक गैरकृत्य चालतात. तिथे सुरु असलेली गैरकृत्यांना आळा घालत आम्हाला या ठिकाणी नमाज पढण्याची परवानगी मिळाली अशी विनंती देखील यावेळी त्यांनी केली.

दरम्यान अबू आझमी यांच्या प्रश्नाला शंभूराज देसाईंचे उत्तर
शिंदे गटाचे मंत्री शुंभुराज देसाई यांनी यावेळी या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले, हुसैनी मस्जिदच्या जागेवर पोलीस अधीक्षक कार्यालय हे हायकोर्टाच्या निर्णयाच्या अधिनराहून उभारण्यात आले आहे. तसेच बाबा बंगाली दर्गा वक्फ बोर्डाकडे वर्ग करण्यात आला आहे. रुमी खान दर्गा बाबत वक्फ बोर्डामार्फत न्यायाधिकरण कडे नोंदणीकृत करण्यासाठी अर्ज सादर केला आहे.

Rahul Gandhi यांची प्रेस म्हणजे ठरलेली रणनिती; भाजपचा पलटवार

सरकारी इमारतींनी, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पोलिसांनी कोणतेही अतिक्रमण केले नाही आहे. मात्र हद्दी जवळ जवळ असल्यान तसेच सरकारी कार्यालये आणि धार्मिक स्थळांच्या काही तक्रारी असू शकतात. आवश्यकता असेल तर मोजमापणी केली जाईल त्यानुसार हद्दी निश्चित केल्या जातील. अल्पसंख्याना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.

ही त्या ट्रस्टची जबाबदारी
दर्ग्यामध्ये तसेच मस्जिदमध्ये गैरप्रकार सुरु असल्याच्या प्रश्नावर शंभूराज देसाई म्हणाले, दर्ग्यामध्ये अशा घटना घडत असतील तर याची सुरक्षेची जबाबदारी त्या ट्रस्टची आहे. मात्र असे प्रकार घडत असेल तर ट्रस्टने याबाबत पोलिसात तक्रार करावी यावर तातडीने कारवाई केली जाईल, असे शंभूराज देसाई म्हणाले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube