विठ्ठलाच्या मदतीला एकनाथ धावला! CM शिंदेंच्या संवेदनशीलपणाने सातारकर भारवले

सातारा : आपल्या मूळगाव दरेतांबहून मुंबईकडे परताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका निराधार वृद्ध दाम्पत्याबाबत माहिती मिळते. वाटेत ते आपला ताफा दाम्पत्याच्या गावाजवळ थांबवतात. आपलं पद अन् राजशिष्टाचार बाजूला ठेवत थेट जमिनीवर बसून दाम्पत्याशी संवाद साधू लागतात. आपुलकीने विचारपूस करतात अन् जिल्हा प्रशासनाला त्या वृध्द दाम्पत्याच्या पुनर्वसनाचे निर्देश देऊन पुढे मार्गस्थ होतात. हा प्रसंग घडला […]

chief ministers eknath shinde help to poor old couple in satara and order to district collector for rehabilitate

chief ministers eknath shinde help to poor old couple in satara and order to district collector for rehabilitate

सातारा : आपल्या मूळगाव दरेतांबहून मुंबईकडे परताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका निराधार वृद्ध दाम्पत्याबाबत माहिती मिळते. वाटेत ते आपला ताफा दाम्पत्याच्या गावाजवळ थांबवतात. आपलं पद अन् राजशिष्टाचार बाजूला ठेवत थेट जमिनीवर बसून दाम्पत्याशी संवाद साधू लागतात. आपुलकीने विचारपूस करतात अन् जिल्हा प्रशासनाला त्या वृध्द दाम्पत्याच्या पुनर्वसनाचे निर्देश देऊन पुढे मार्गस्थ होतात.

हा प्रसंग घडला साताऱ्यातील पिंपरीतांब या गावी. इथल्या विठ्ठल धोंडू गोरे आणि त्यांच्या पत्नीच्या मदतीला धावून गेल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशीलपणाचे दर्शन पुन्हा एकदा सातारकरांना झाले. तसेच या एवढ्याशा प्रसंगातून ‘विठ्ठलाच्या मदतीला एकनाथ धावला’ असाच काहीसा अनुभव आज (24 जून) सातारकरांना आला. (chief ministers eknath shinde help to poor old couple in satara and order to district collector for rehabilitate)

नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळगावी दरे येथे गेले होते. या दरम्यान, दरे येथे वास्तव्यात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तापोळा आणि दरे दरम्यान नव्याने होत असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी एका ग्रामस्थाने त्यांना जवळच एक निराधार वृद्ध दाम्पत्य रहात असल्याचे निदर्शनास आणून दिले. यानंतर क्षणाचाही विलंब न लावता मुख्यमंत्री शिंदे यांनी या दम्पत्याची भेट घेण्याचे ठरविले.

Nitesh Rane : ‘हिच ती वेळ.. काय ते उद्या बोलू..’ नितेश राणेंच्या ‘त्या’ ट्विटचा रोख कुणाकडे?

पिंपरीतांब येथील भागडवाडी विठ्ठल धोंडू गोरे (75) आपल्या पत्नीसह राहतात. त्यांची देखभाल करणार कुणीही नाही. त्यामुळ तुटपुंज्या पैशांमध्ये संसाराचा गाडा ओढत ते पडक्या झोपडीत वास्तव्य करतात.

मुख्यमंत्री शिंदे या दाम्पत्याजवळ गेले आणि थेट जमिनीवर बसून त्यांच्याशी संवाद साधला. पावसाळ्यात तुम्ही अशा अवस्थेत कसे राहणार..? त्याऐवजी गावाजवळ का रहात नाही असे त्यांना विचारले. मात्र त्यावर त्यांनी काहीही ठोस उत्तर दिले नाही. अखेरीस मुख्यमंत्र्यांनी या दाम्पत्याला पावसाळ्यात लागेल तेवढे अन्न धान्य आणि मदत देण्याचे निर्देश दिले. तसेच अशा ठिकाणी राहत असल्याने त्यांना अचानक मदत लागल्यास कुणीही मदत करू शकणार नाही, त्यामुळे गावाजवळ रहावे अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी त्यांना केली.

कुकडी पाणी प्रश्न : जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, विखेंचे वळसे पाटलांना सडेतोड उत्तर

मुख्यमंत्री शिंदे नुसते विनंती करुनच थांबले नाहीत. त्यांनी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना या वृद्ध दाम्पत्याचे त्वरित पुनर्वसन करण्याचे निर्देश दिले. तसेच याबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहचविण्याच्या सुचनाही त्यांना दिल्या. मुख्यमंत्र्यांचा हा साधेपणा आणि संवेदनशीलता पाहून सातारकरची जनता अक्षरशः भारावून गेली.

Exit mobile version