Download App

वैष्णवी हगवणे प्रकरणात CID चौकशी करा नाहीतर…, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Manoj Jarange On Vaishnavi Hagavane : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण गेल्या काही दिवसांपासून राज्यात गाजत असून या प्रकरणावरुन

Manoj Jarange On Vaishnavi Hagavane : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण गेल्या काही दिवसांपासून राज्यात गाजत असून या प्रकरणावरुन राजकार देखील चांगलेच तापले आहे. या प्रकरणात (Vaishnavi Hagavane Case) आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर आता या प्रकरणात मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) सीआयडी (CID) चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

वैष्णवीची आत्महत्यानसून ही हत्या आहे. अजून देखील एक जण फरार आहे. वैष्णवीची सामूहिक कट रचून हत्या करण्यात आली आहे. फोटोमध्ये मारल्याचा स्पष्ट दिसत आहे. सगळ्यांनी मिळून घटना घडवली आहे त्यामुळे 120 ब लावला नाही. मोक्का लावताव म्हणाला त्याची प्रोसेस सुरू आहे का? हे कुटुंबाला कोणीच बोल नाही,का लपवत आहे. असं माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले.

महिलांवर अन्याय होत असेल तर कारवाई करा

तर या प्रकरणात आरोपींना फाशी देऊन न्याय झाला पाहिजे. या प्रकरणी जर न्याय झाला नाही तर पुन्हा उठाव होईल. महिला आयोगने (Women Commission) जर महिलांवर अन्याय होत असेल तर कारवाई करायला पाहिजे. आयोग यासाठी केला आहे. असं देखील जरांगे पाटील म्हणाले. महिला आयोगावर राजकीय व्यक्ती बसते ती प्रत्येकाची प्रथा आहे,ज्याची सत्ता येती तो आपला व्यक्ती बसवतो,पण कुणीही ह्या आयोगावर बसला तर त्यांनी काम चांगलं केलं पाहिजे जेणेकरून नाव निघेल आणि महिलांना न्याय मिळेल. असेही माध्यमांशी मनोज जरांगे पाटील म्हणाले.

तसेच या प्रकरणात तपास काय चालू आहे हे तपासी यंत्रणाकडून कुटुंबियांना कळवलं जात नाही , तपासा बाबतची सर्व माहिती कुटुंबाला मिळायला हवी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांना मोठा दिलासा, बंद होणार POCSO खटला

तर दुसरीकडे 23 वर्षीय वैष्णवी हगवणे प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी वैष्णवीचा पती, तिचा दीर, सासू, सासरा आणि नदंण यांना अटक केली आहे.

follow us