वैष्णवी हगवणेच्या कुटुंबाच्या भेटीनंतर धनंजय देशमुखांकडून थेट आंदोलनाचा इशारा

Dhananjay Deshmukh warns of direct protest after meeting Vaishnavi Hagavane’s family : बहुचर्चित पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील (Vaishnavi Hagawane Case) फरार आरोपी सासरा राजेंद्र हगवणे (Rajendra Hagawane) आणि दीर सुशिल हगवणे (Sushil Hagawane) यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान या प्रकरणावर राजकारणासह सर्वच स्तरावरून संताप व्यक्त केला जात आहे. वैष्णवीच्या माहेरी म्हणजे कस्पटे कुटुंबाची नेत्यांकडून भेट घेतली जात आहे. त्यात आज बीडमध्ये हत्या झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी कस्पटे म्हणजे वैष्णवीच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.
काय म्हणाले धनंजय देशमुख?
गेल्या काही महिन्यांपूर्वी माझे बंधू संतोष देशमुख यांना नराधमांनी मारले. त्यानंतर त्यांचे कुटुंब निराधार झाले आहे. हे भोग भोगणं सोप नाही. त्यानंतर आता तशीच परिस्थिती कस्पटे म्हणजे वैष्णवीच्या कुटुंबावर आली आहे. त्यामुळे ज्या प्रमाणे आम्ही आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करत आहोत. तशीच शिक्षा वैष्णवीचा छळ करणाऱ्यांना व्हावी. अशी आपेक्षा आहे.
ऋषभ शेट्टी-सुकुमार ते अल्लू अर्जुन-राजमौली, ‘या’ अभिनेता-दिग्दर्शक जोड्या पडद्यावर ठरले सुपरहिट
मात्र खरं तर हा न्याय मागण्याची गरजच नाही. संतोष देशमुख आणि वैष्णवी सारख्या निरापराध लोकांना त्यांचा काहीही दोष नसातना क्रुर पद्धतीने संपवलं गेलं आहे. त्यामुळे जर न्याय मिळणार नसेल तर त्यासाठी अहिंसेच्या मार्गाने रस्त्यावर उतरावं लागेल त्याशिवास न्याय मिळणार नाही. मोर्चे आंदोलन करावीच लागतील असं म्हणत धनंजय देशमुख यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरणं?
पुण्यातील राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन जीवन संपवल्यानं खळबळ उडाली. दरम्यान, वैष्णवीच्या मृत्यूवरून आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच तिचा शवविच्छेदन अहवाल समोर आला. या अहवालातून काही धक्कादायक माहिती उघड झाली. गळफास घेऊन जीवन संपवणाऱ्या वैष्णवीच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या, असं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलंय.
शुक्रवारी वैष्णवी हगवणे हिने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर वैष्णवीच्या माहेरच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केले होते. तसेच वैष्णवीचे वडील आनंद उर्फ अनिल साहेबराव कस्पटे यांनी सासरच्या मंडळींविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. वैष्णवीचा पती, सासू-सासरे, नणंद आणि दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून वैष्णवीला क्रूर वागणूक दिली, असल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी त्यांच्या तक्रारीत केला होता.
ग्राम चिकित्सालय अभिनेत्री आकांक्षा रंजन कपूरने शेअर केली अरुणाभ कुमारसोबत BTS फोटो अन्…
वैष्णवी हगवणेच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या. या जखमांमुळे तिचा मृत्यू झाला असू शकतो, अशी शक्यता असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं या शवविच्छेदन अहवालामुळं आता या प्रकरणाला वेगळं वळण लागू शकतं. वैष्णवीने आत्महत्या केली का? की, तिच्यासोबत काही घातपात घडला? असे अनेक प्रश्न या अहवालामुळे निर्माण झालेत. या घटनेप्रकरणी वैष्णवीची सासू आणि नणंद यांना पोलिसांनी अटक केली होती, मात्र वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील सात दिवसांपासून फरार होते. या दोघांना शोधण्यासाठी पोलिसांचं पथक तपास करीत होतं. अखेर आज पहाटेच्या सुमारास एका छोट्याशा खेडेगावातून दोघांना अटक करण्यात आलीयं.