Download App

लाडक्या बहिणींंनंतर आता लाडक्या भावांचीही पडताळणी; शासकीयऐवजी खासगी उद्योगांमध्येच प्रशिक्षण

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून राज्यातील १० लाख तरुणांना दरवर्षी सहा महिन्यांच्या प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे.

  • Written By: Last Updated:

CM Youth Work Training : लाडकी बहीण योजनेच्या निकषांनुसार लाभार्थी महिलांची पडताळणी सध्या सुरू आहे. याच धर्तीवर आता लाडक्या भावांसाठीच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी देखील आता (Youth ) निकषांवर बोट ठेवलं जात आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या योजनेतून दीड महिन्यांतच सुमारे साडेचार लाख तरुणांनी अर्ज केले होते. त्यामध्ये प्रत्येक तरुणांसह मनुष्यबळाची मागणी करणाऱ्या आस्थापना, उद्योगांचीही पडताळणी केली जाणार आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून राज्यातील १० लाख तरुणांना दरवर्षी सहा महिन्यांच्या प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. १८ ते ३५ वयोगटातील इयत्ता बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर पदवीप्राप्त तरुणांना त्यांच्या शिक्षणानुसार नोकरीपूर्वी सहा महिन्यांचे प्रशिक्षण या योजनेतून दिले जात आहे. त्यासाठी त्या तरुणांना शैक्षणिक पात्रतेनुसार सहा ते दहा हजारांचे दरमहा विद्यावेतन दिले जात आहे.

दिग्गजांची नावे घेत अजितदादांसाठी उमेश पाटील विरोधकांना भिडले; भाजपलाही दिली आठवण

विधानसभा निवडणुकीपूर्वी अर्ज केलेल्या तरुणांना घाईघाईत त्यांच्या आवडीनुसार शासकीय निमशासकीय व खासगी आस्थापनांसह उद्योगांमध्ये प्रशिक्षणाची संधी देण्यात आली. त्यावेळी ना उद्योगांची ना अर्जदार तरुणांची पडताळणी केली. आता मात्र अर्जदार तरुण खरोखर मान्यताप्राप्त आस्थापना, खासगी उद्योगांमध्ये प्रशिक्षण घेण्यास पात्र आहेत का याची आणि आस्थापनांची पात्रता कागदपत्रांआधारे पडताळून पाहिली जाणार आहे. चुकीच्या मार्गाने कोणी योजनेचा लाभ घेऊ नये हा त्यामागील हेतू आहे.

खासगी उद्योगांमध्येच घेता येईल प्रशिक्षण

योजनेअंतर्गत खासगी आस्थापना व उद्योगांकडील (कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणीकृत) एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या दहा टक्के व सेवा क्षेत्रासाठी २० टक्के तर केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापना, उद्योग, महामंडळात मंजूर पदाच्या पाच टक्के उमेदवार प्रशिक्षणासाठी घेता येतात.

तरीदेखील, बहुतेक उमेदवारांनी शासकीय आस्थापनांमध्येच प्रशिक्षणासाठी अर्ज केले. आता त्यातील बहुतेक तरुणांनी त्याच कार्यालयात कायम करण्याची मागणी केली असून त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदनेही पाठविली आहेत. ही बाब भविष्यातील डोकेदुखी ठरू नये म्हणून यापुढे तरुणांना खासगी उद्योगामध्येच प्रशिक्षणाची संधी दिली जाणार आहे. त्यानुसार खासगी उद्योजकांकडून मनुष्यबळाची मागणी नोंदविली जात आहे.

कार्य प्रशिक्षण योजनेची स्थिती

दरवर्षी प्रशिक्षणार्थींचे उद्दिष्ट

१० लाख

निधीची वार्षिक गरज

८०० कोटी रुपये

प्रशिक्षणाचा कालावधी

६ महिने

दरमहा मिळणारे विद्यावेतन

६,००० ते १०,०००

follow us