Download App

जाणीवपूर्वक उदात्तीकरणाचा प्रयत्न, पण औरंगजेब मुस्लिमांचाही हिरो होऊ शकत नाही, CM फडणवीसांनी सुनावलं…

औरंगजेबाने संभाजी महाराजांना कपट करून पकडलं, त्यामुळं भारतातल्या हिंदूंच नाही तर मुस्लिमांसाठीही औरंगजेब कधी हिरो असू शकत नाही

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी औरंगजेब (Aurangzeb) हा उत्तम प्रशासक होता, असं विधान केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर चांगलंच राजकारण तापलंय. त्यांच्या या वक्तव्याचे महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील पडसाद उमटले असून अबू आझमींनी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी (Devendra Fadnavis) यांनी औरंगजेब (Aurangzeb)त्याचे गोडवे गाणारे लोक यांच्याबाबत रोखठोक भूमिका मांडली.

‘बायको माझं रक्त पिते, त्यामुळे झोपच…’ पोलीस कॉन्स्टेबलसोबत भयंकर घडतंय 

एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलतांना फडणवीस म्हणाले की, औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या लोकांवर आजच निलंबनाची कारवाई झाली. ते लोक जाणीवपूर्वक बोलत राहतात. कारण त्यांना त्यांची व्होट बँक वाचवायची आहे… पण जगाला माहिती आहे की औरंगजेबाने हिंदूंची मंदिरे तोडली, हिंदूंवर कर लावले. सर्वात वाईट गोष्ट काय तर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं. छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्याविषयी हे म्हटलं जातं की, देश दर्म पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी, परमप्रताली एकही शंभू राजा था, असं फडणवीस यांनी म्हटलं.

Santosh Deshmukh Case: …म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती उशीरा, CM फडणवीसांचा खुलासा… 

छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाशी ९ वर्षे लढा दिला. त्यातली एकही लढाई ते हरले नाहीत. औरंगजेबाने संभाजी महाराजांना कपट करून पकडलं, त्यानंतर ज्या कौर्याने त्याने संभाजी महाराजांना मारलं, त्यामुळं भारतातल्या हिंदूंच नाही तर मुस्लिमांसाठीही औरंगजेब कधी हिरो असू शकत नाही, असं फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले, आपल्या देशात एक परंपरा आहे. बरेच लोक आपल्या मुलांची नावे राम, कृष्ण, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून ठेवतात. मला तुम्ही औरंगजेब नावाचा मुलगा आहे का? दाखवा. मुस्लिमांचाही औरंगजेब हा नायक होऊच शकत नाही. अशावेळी औरंगजेबाचे गोडवे गाण्यामागे त्यांचा हा विचार आहे की, समाजवादी पक्ष ही उत्तर प्रदेशातही निवडणूक लढणार आहे. त्यांना वाटतं की, लांगुलचालनाचं राजकारण केलं तर आपल्याकडील व्होट बँक तशीच राहील. मात्र, त्याचा काहीही परिणाम होणार नाही, असं फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले, अखिलेश यादवांनी सांगावं की, त्यांचे पूर्वज आणि ते स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आहेत? की, त्यांना औरंगजेबाचे वारसं म्हणून घ्यायचं आहे… जे औरंगजेबाचा वारसा सांगतात, तेच असं काहीतरी बोलू शकतात, असं फडणवीस म्हणाले.

follow us