Download App

शिवसेना हादरली ! मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उपविभाग प्रमुखाची हत्या

ठाणे : शिवसेना (Shiv Sena) व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यामध्येच शिवसेने उपप्रमुखांची (Shiv Sena Deputy Chief) हत्या झाल्याची धक्कदायक माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात ही हत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली. या हत्या झालेल्या व्यक्तीवर काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी उपप्रमुखपदाची जबाबदारी दिली होती.

उपप्रमुखाची जबाबदारी मिळाल्यावर काही दिवसातच त्यांची हत्या झाल्याने शिवसेनाचा मोठा धक्का बसला. यामुळे ठाणे परिसरात मोठी खळबळ उडाली. रवींद्र परदेशी (वय ४८, रा.खारकर आळी, ठाणे ) असे हत्या झालेल्या शिवसेना उपप्रमुखाचे नाव आहे. मंगळवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली.

परदेशी हे जांभळी नाका येथील शिवेसनेचे उपविभाग प्रमुख होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच त्यांच्यावर नवीन जबाबदारी दिली होती. परदेशी यांच्या हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. परदेशी यांची मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तीक्ष्ण हत्यारांनी हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आला आहे.

Bharat Gogawale : संजय राऊत आमच्या मतावर निवडून आलेत त्यांनी राजीनामा द्यावा

काय नेमकं प्रकरण ?

घरी जात असताना त्यांच्यावर अज्ञान व्यक्तींनी हल्ला केला. फेरीवाल्यांच्या वादातून टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. जखमी अवस्थेत परदेशी यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणे नगर पोलीस करत आहेत.

ठाण्यातील मुख्य बाजारपेठेत रवींद्र परदेशी यांचा कटलरीचा व्यवसाय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातच शिवसेना उपप्रमुखांची हत्या झाल्याने राज्यातील कायद्या सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याचे ठाण्यातील नागरिकांनी सांगितले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ठाणे नगर पोलीस करत आहेत.

Tags

follow us