Bharat Gogawale : संजय राऊत आमच्या मतावर निवडून आलेत त्यांनी राजीनामा द्यावा

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 01T154033.511

मुंबई :  शिवसेनेचे ( Shivsena ) शिंदे गटाचे आमदार व विधानसभेतील प्रतोद भरत  गोगावले ( Bharat Gogawale ) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर ( Sanjay Raut ) जोरदार निशाणा साधला आहे. राऊत हे आमच्या 40 आमदारांच्या मतदानावर निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, असे आव्हान गोगावलेंनी राऊतांना दिले आहे. संजय राऊत यांनी आज माध्यमांसमोर बोलताना विधीमंडळाला चोरमंडळ म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याविरोधात शिंदे गटाचे आमदार आक्रमक झाले आहेत.

संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर हक्कभंग आणण्यात यावा, असे गोगावले म्हणाले आहेत. तसेच त्यांनी विधीमंडळाला चोरमंडळ म्हणून संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांना अटक करण्यात यावी, अशी आमची मागणी असल्याचे गोगावले यांनी सांगितले. यावेळी शिंदे गटाच्या आमदारांनी विधाभवनाच्या परिसरात राऊतांच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.  राऊत हे राज्यसभेवर खासदार म्हणून आमच्या 40 आमदारांच्या मतावर निवडून गेले आहेत. त्यामुळे त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि त्यानंतर आमच्यावर आरोप करावेत, असे त्यांनी राऊतांना खडसावले.

Sanjay Raut : हक्कभंग आणणे म्हणजे नक्की काय? संजय राऊत यांना काय शिक्षा होऊ शकते?

दरम्यान आज विधानसभेत या मुद्द्यावरुन जोरादर हंगामा झाला. भाजप आमदार आशिष शेलार, अतुल भातखळकर यांनी राऊतांवर हक्कभंग आणावा अशी मागणी केली. यानंतर विधानसभा अध्यक्षांनी राऊतांना नोटीस बजावली असून दोन दिवसांमध्ये निर्णय घेणार असे सांगितले आहे.

या निर्णयावर समाधानी न होता, शिंदे गटाच्या आमदारांनी विधानसभेच्या वेलमध्ये येत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी विधानसभेचे आजचे कामकाज दिवसभराकरिता स्थगित केले आहे. याचबरोबर विधानपरिषदेचे कामकाज देखील आज तहकुब करण्यात आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube