Download App

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कसब्यात ३० कोटी वाटले… Ravindra Dhangekar यांचा खळबळजनक आरोप!

  • Written By: Last Updated:

पुणे : सध्या देशात हुकूमशाही आली आहे का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामळे सामान्य माणसांनी निवडणूक लढवायचीच नाही का असा प्रश्न पडला आहे. चोऱ्यामाऱ्या करुन कोट्यवधी रुपये आणून येथे वाटायचे आणि सामान्य कार्यकर्त्याला बदनाम करायचे, सत्ताधारी हे काय जनतेचे मालक झाले आहेत का, असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच कसब्यात पैसे वाटत होते. कसब्यात मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपच्या (BJP Minister) मंत्र्यांनी ३० कोटी रुपये वाटले, असा खळबळजनक आरोप कसबा पेठ (Kasba Peth Bypoll) मतदार संघातील महाविकास आघाडीचे (MVA) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केला आहे.

चक्क सॅटेलाइटद्वारेच EVM चा ताबा, यामागे मोठे षडयंत्र; चंद्रकांत खैरेंचा खळबळजनक आरोप

कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि. २६) रोजी मतदान पार पडले. पोटनिवडणूक सुरु होण्यापासूनच कसबा मतदार संघ राज्यात चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून कसब्यातील वाद संपण्याचे नाव घेईना. आता मतदान पार पडल्यानंतरही आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. निवडणूक आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी सोमवारी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषदेत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच भाजपच्या मंत्र्यांसह पैसे वाटत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

Eknath Shinde :मुख्यमंत्री पडता पडता वाचले, संकटमोचक गिरीश महाजनांनी हात देऊन सावरले

रवींद्र धंगेकर म्हणाले की, जर निवडणूक आयोग खोट्यापद्धतीने गुन्हे दाखल करत असेल तर आता निवडणूक आयोगावरच गुन्हा दाखल करावा लागेल. राज्यात सत्ताधारी हे लोकशाही धाब्यावर बसवण्याचे काम करत आहे. मुख्यमंत्री जर कसब्यात पैसे वाटत असेल तर ही गंभीर बाब आहे. जे सर्वसामान्यांना दिसत आहे. ते निवडणूक आयोगाला दिसत नाही का, मग निवडणूक  आयोग नक्की काय काम करत आहे, असा प्रश्न पडत आहे. निवडणूक आयोग हे जर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह भाजपच्या मंत्र्यांवर कारवाई करायचे सोडून सामान्य कार्यकर्त्याला त्रास देत असेल तर निवडणूक आयोगावरच गुन्हा दाखल करावा लागेल.

Tags

follow us