Download App

तुमच्या बाजूनं निर्णय दिल्यास संस्था चांगल्या अन्… मुख्यमंत्री शिंदेंनी फटकारलं

तुमच्या बाजूनं निर्णय दिला की संस्था चांगल्या अन् नाही दिला तर आपल्याला माहितच आहे, काय बोलतात ते, या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना फटकारलं आहे. सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सविस्तरपणे भाष्य केलं आहे.

SS Rajamouli घेऊन येणार महाभारताचे 10 भाग ? राजामौली यांचा ड्रीम प्रोजेक्ट

तसेच आम्ही घटनात्मक, कायदेशीर बाबींची काळजी घेऊनच सरकार स्थापन केलं होतं, त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता, असं विधानही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

ते म्हणाले, लोकशाहीमध्ये अपेक्षित असलेला निकाल आज सर्वोच्च न्यायलायने दिला आहे, त्याबद्दल सर्वांना माझ्या शुभेच्छा. अखेर अनेक दिवसांपासून सुरु असलेला संघर्ष थांबला असून अखेर सत्याचाच विजय झाला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Maharashtra Satta Sangharsh: कोर्टाच्या निकालानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘हे सरकार बेकायदेशीर..’

आपल्या देशात कायदा, संविधान नियम व अटी आहेत. लोकशाहीत बहुमताला महत्व आहे. त्यामुळे आम्ही घटनात्मक, कायदेशीर बाबींची पूर्तता करुनच सरकार स्थापन केलं होतं. शेवटी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता असंही ते म्हणाले आहेत.

त्यानंतर आम्ही स्थापन केलेल्या सरकारवर आज सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं आहे. सर्वोच्च न्यायालायाचा निकाल हा घटनाबाह्य, बेकायदेशीर सरकार म्हणाणाऱ्यांना चपराक असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना लगावला आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांवरही टीकेची तोफ डागली आहे.

.. म्हणून झिरवळ नॉट रिचेबल असतील; उदय सामंतांनी सांगितलं नेमकं कारण

ते म्हणाले, आम्ही काही महिन्यांपूर्वी जनमताचा आदर करुनच निर्णय घेतला होता. त्यामुळे नैतिकता कोणी जपलीयं हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही. या लोकांनी शिवसेना आणि धनुष्यबाण गहाण ठेवला होता. ते सोडवण्याचं काम आम्ही केलं असल्याचं म्हणत त्यांनी विरोधकांवर टोलेबाजी केलीय.

दरम्यान, आजच्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने बहुमताचा आदर करुनच निर्णय दिला आहे. विरोधकांच्या बाजूने निकाल दिला असता तर न्यायव्यवस्था देशातल्या स्वायत्त संस्था चांगल्या, असं विरोधक बोलतात नाही दिला तर आपल्याला माहितच आहे ते काय बोलतात ते, असंही मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केलंय.

Tags

follow us