SS Rajamouli घेऊन येणार महाभारताचे 10 भाग ? राजामौली यांचा ड्रीम प्रोजेक्ट

SS Rajamouli घेऊन येणार महाभारताचे 10 भाग ? राजामौली यांचा ड्रीम प्रोजेक्ट

SS Rajamouli: एसएस राजामौली हे भारतीय चित्रपटसृष्टीतील असं नाव ज्यांनी त्यांचे भव्यदिव्य चित्रपट आणि बॉक्स ऑफिसवरील भरघोस यशाने चित्रपटसृष्टीतील अस्तित्त्व सिद्ध केले आहे. (Dream Project) ‘बाहुबली’ (Bahubali) चित्रपटाचं यश आणि त्यानंतर बाहुबलीचा दुसरा भागही ते घेऊन आले होते. (SS Rajamouli) या चित्रपटाची भव्यता, कलाकार या सगळ्याने प्रेक्षकांच लक्ष वेधून घेतले आहे. कल्पनांच्या पलिकडे चित्रपटाला स्वरुप देऊन प्रेक्षकांना अविस्मरणीय अनुभव देणारे चित्रपट त्यांनी दिले आहेत. तर ‘आरआरआर’ (RRR) सारख्या चित्रपटाने भारताला ऑस्कर मिळवून दिला. या चित्रपटाच्या ‘नाटू नाटू’ या गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला.

या चित्रपटांनंतर आता राजामौली आणखी एक भव्य चित्रपट घेऊन येणार आहेत. (Mahabharata part) हा राजामौली यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. यंदा राजामौली प्रेक्षकांसाठी महाभारत मोठ्या पडद्यावर घेऊन येणार आहेत. नुकतीच त्यांनी याविषयी इच्छा देखील व्यक्त केली होती. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी याविषयी नवा खुलासा केला आहे. महाभारत बद्दलचे जे काही लिखाण आणि साहित्य उपलब्ध आहे, त्याचं राजामौली सविस्तर वाचन करणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by SS Rajamouli (@ssrajamouli)


या वाचनासाठीच त्यांना जवळपास एक वर्ष जाईल असं त्यांनी यावेळी सांगितले आहे. शिवाय महाभारतावर आधारित चित्रपट करायचा असेल तर हा विषय बघता ते 10 भागांमध्ये बनू शकतो, असं त्यांनी यावेळी सांगितले आहे. महाभारताचा विषय हा चित्रपट रुपात समोर आणणं हे मोठं आव्हान राजामौली कसं पेलणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. शिवाय या चित्रपटातील विविध भूमिका कोण साकारणार याची देखील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by SS Rajamouli (@ssrajamouli)


महाभारतातील इतकी पात्रे कोणकोणते कलाकार साकारतील याचीही चर्चा सुरु आहे. यातच यावरही राजामौली यांनी स्पष्टीकरण दिले आहे. राजामौली म्हणतात की, “मी महाभारतासाठी जेव्हा पात्रं लिहिन ती तुम्ही आजवर पाहिलेल्या पात्रांप्रमाणे नसतील. कथेचा मूळ गाभा तोच असेल, पण या पात्रांच्या नातेसंबंधांवर विस्तृतपणे भाष्य करणार आहे. मला माहीत आहे प्रेक्षकांनी आधीच कोणता कलाकार कोणतं पात्र साकारणार याबद्दल चर्चा सुरू केली आहे. मी जेव्हा ती पात्रं लिहिन तेव्हाच याबद्दल सविस्तर माहिती देऊ शकणार आहे.

‘द केरळ स्टोरी’ची सहाव्या दिवशीही छप्पर फाड कमाई, कमावले ‘इतके’ कोटी

एसएस राजामौली हे नाव आता भारतातच नाही तर जगप्रसिद्ध झाली आहे. विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात अगदी जेम्स कॅमेरॉन सारख्या आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती असलेल्या दिग्दर्शकानेही राजामौली यांचं कौतुक केलं होतं. तेव्हा राजामौली यांचं महाभारतावर आधारित ड्रीम प्रोजेक्टची भव्यता, त्याचं सादरीकरण, त्यासाठी कलाकारांची निवड, त्यासाठी करावा लागणारा रिसर्च ही सगळी प्रक्रिया लक्षवेधी असेल यात काही शंका नाही. त्यासाठी मोठा कालावधी लागेल हेही देखील तितकच खरय असलयाचे सांगितले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube