मी घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नाही, कोण मदत करणारं आणि कोण बडबड करणारं हे शेतकऱ्यांना चांगलचं माहीत असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. आज अहमदनगरमधील पारनेमध्ये शेतकऱ्यांच्या नूकसानीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही जे काही करतो ते बेधडक करतो. विरोधकांनी शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळू नये. आमचं सरकार लांबून आदेश देणार नसून शेतकऱ्याच्या बांधावर नाही तर शेतात जाऊन पाहणी करणारं असल्याचाही टोला त्यांनी लगावला आहे.
पैशांच्या उधळपट्टीला चाप ! ‘या’ निवडणुकीतही उमेदवारांची खर्च मर्यादा झाली फिक्स..
तसेच मंत्री चंद्रकांत पाटलांनी बाळासाहेबांबद्दल मांडल्याची भूमिका स्पष्ट असल्याचं त्यांनी म्हटलंय. बाळासाहेब देशहितासाठी, सावरकर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सडेतोड भूमिका मांडत होते. मी अयोध्या दौऱ्यावर असतानाा राज्यात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे राज्यातल्या शेतकरी हवालदिल झाला असून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मी अयोध्येतून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आलो आहे.
आमची श्रद्धा जशी रामाशी आहे तशीच शेतकऱ्यांच्या घामाशीही असून हे सरकार शेतकऱ्यांचं आहे. जे काही करणार ते मी शेतकऱ्यांच्या हिताचंच करणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
बाबरीच्या इतिहासातून बाळासाहेबांचं नाव पुसण्याचा प्रयत्न; शिंदे राजीनामा देणार का? राऊतांच ओपन चॅलेंज
अयोध्या दौऱ्यावर असताना मी श्रीरामाकडे राज्यातला बळीराजा सुखी ठेवण्याची मागणी केल्याचंही त्यांनी सांगितलं असून मी घरात बसून आदेश देणारा मुख्यमंत्री नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, अयोध्येत राम मंदिर आणि जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवण्याच बाळासाहेबांचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाहा यांनी केलं असून विरोधकांना नैतिकता गमावली असल्याचा टोलाही लगावला आहे.
अहमदनगर दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी वनकुटे गावाची पाहणी केली आहे. याप्रसंगी शेतकऱ्यांची मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत देणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी दिलं आहे.