बाबरीच्या इतिहासातून बाळासाहेबांचं नाव पुसण्याचा प्रयत्न; शिंदे राजीनामा देणार का? राऊतांच ओपन चॅलेंज
Sanjay Raut angry on Chandrakant Patil and Eknath Shinde: राज्यात भाजप, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतात. अशातच काल भाजपचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी बाबरी मशीदी (Babri Masjid) संदर्भात मोठं विधानं केलं. बाबरी मशीद पाडण्यात बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) आणि शिवसेनेचा (Shiv Sena) काहीही संबंध नव्हता, असं खबळजनक वक्तव्यं केलं. दरम्यान, आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर जोरदार हल्लाबोल केला.
बाबरी मशीदी संदर्भात बोलतांना चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, बाबरी मशीद पाडण्यात बाळासाहेब ठाकरेंचा आणि शिवसेनेचा काहीही संबंध नव्हता बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर बाळासाहेब म्हणाले होते की, बाबरी मशीद पाडली, त्याची जबाबदारी मी घेतो. पण, त्यावेळी अयोध्येमध्ये शिवसेना गेली होती का? की बाळासाहेब तिथं गेले होते, असा सवाल त्यांनी केला. चंद्रकांत पाटलांच्या यी वक्तव्याविषयी बोलतांना राऊत म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर आरोप केला. शिवसैनिक हा शब्द नंतर आहे. अयोध्येतून परल्यावर चंद्रकांत पाटलांचा आरोप आहे, की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची बाबरी पाडण्यात कोणतीही भूमिका नाही, कोणताही रोल नाही. त्यांनी काही सरदार पाठवले नव्हते, असं ते सांगतात. चंद्रकांत पाटील हे फार कुचेष्टेने वक्तव्ये करत असतात. ते मुद्दाम बाळासाहेब आणि शिवसेनेवर चिखलफेक करत आहेत. त्यांनी शिवसेनेला संपवायचं आहे, त्यासाठी ते असे आरोप करत असतात, असं राऊत म्हणाले.
YouTube Down : यूट्यूब डाऊन झाल्याने नेटीझन्स संतापले; ट्विटरवर व्यक्त केला संताप
राऊत यांनी सांगितले की, पण, आज सरकारमध्ये जे भाजपच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. काल बाळासाहेबांच्या विरोधकांच्या चड्डीची नाडी पकडून जे अयोध्येत हातात धनुष्यबाण घेऊन फिरत होते, त्या मिस्टर डॉक्टर मिंधे आणि त्यांच्या 40 आमदारांचं यावर काय मत आहे? असा सवाल राऊतांनी केली. राऊत म्हणाले की, शिंदे गटाकूडन सांगण्यात येतं असतं की, हिंदुत्वासाठी त्यांनी शिवसेना सोडली. खरंतर बाळासाहेबांचा अपमान करायची कुणाची हिंम्मत नाही. चंद्रकांत पाटलांच्या मुखातून भाजप बोलत आहेत. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावर मिंधे काय भूमिका घेतात, पाटलांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करून हातात दांडका घेतात की भाजपला शरण जातात… त्यांनी राजीनामा द्यावा. अन्यथा भूमिका घ्यावी. त्याशिवाय, त्यांना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा हक्क नाही, असं राऊत म्हणाले.
अयोध्येच्या संदर्भात आणि त्यानंतरच्या घडामोडीत हिंदुत्वाची मशील चेटत राहावी, यासाठी बाळासाहेबांनी केलेला त्याग देशाला माहित आहे. आणि बाळासाहेबांच्या त्यागातूनच भाजप तयार झाला. बाळासाहेब त्या बाबरी कांडानंतर लखनऊला गेले आणि सीबीआय समोर हजर झाले. त्यातील ते प्रमुख आरोपी होते. हा इतिहास भाजपला ठाऊक नाही का? असा सवाल त्यांनी केला.