Download App

सावरकरांचा हिंदुत्वाचा विचार लोकप्रिय झाला तर… मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर निशाणा

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदुत्वाचा विचार लोकप्रिय झाला तर आपला बाजार कायमचा उठेल, अशी विरोधकांना भीती असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

भाजपविरोधी पक्षांच्या एकजूटीची तारीख ठरली? 18 पक्षांचे नेते सहभागी होणार

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मृत्यूला अनेक वर्ष उलटून गेले तरी इथल्या लोकांना अद्याप सावरकर समजलेले नाहीत. काही लोकं जाणीवपूर्वक सावरकरांचा अवमान करीत आहेत, सावरकरांचा हा अवमान चीड आणणारा असल्याचं ते म्हणाले आहेत.

नाशिकच्या बांगडी व्यवसायिकाला महावितरणचा ‘शॉक’…

तसेच सावरकरांवर इंग्रजांनी अनेक अत्याचार केले पण सावरकरांनी कधीही तडजोड केलेली नाही. सावरकरांचा त्याग हेच विरोधकांसाठी चोख उत्तर आहे. त्यांच्याविषयीची दहशत आजही अनेकांच्या मनात तशीच आहे, म्हणूनच ते वारंवार त्यांच्याबद्दल जाणीवपूर्वक वक्तव्ये करीत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

‘संसद भवन लोकशाहीतलं मंदिर, त्याचा इव्हेंट करू नका; सुळेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

सावरकरांचा हिंदुत्वाचा विचार लोकप्रिय झाला तर आपला बाजार कायमचा उठेल, अशी भीती विरोधकांच्या मनात आहे. भारत देश हा हिंदुंचा देश हिंदुंच्या नावानेच ओळखला गेला पाहिजे, असा सावकरांचा आग्रह असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, मुंबईत शासनाच्या माध्यमातून समुद्र सेतूच काम सुरु आहे. हा समुद्र सेतू स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने ओळखला जाणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केलीय. तसेच सावरकर शौर्य पुरस्कार राज्य सरकार सुरु करणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. सावरकरांची देशभक्ती शौर्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यास सरकार कुठेही कमी पडणार नसल्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं आहे.

Tags

follow us