भाजपविरोधी पक्षांच्या एकजूटीची तारीख ठरली? 18 पक्षांचे नेते सहभागी होणार
opposition Unity : गेल्या काही दिवसांपासून देशातील भाजपविरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी वेगवेगळ्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. अशात बिहारच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पटनामध्ये विरोधी पक्षांची एक मोठी बैठक होणार आहे. ही बैठक 12 जूनला होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी या बैठकीत भाजपविरोधी पक्ष सहभागी होणार आहेत. यात 18 पक्षांचा सहभाग असल्याची चर्चा समोर येत आहे.
या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत रणनीती आखली जाणार आहे. पाटणा येथे 12 जून रोजी होणाऱ्या बैठकीत सर्व भाजप विरोधी पक्ष सहभागी होणार आहेत. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत रणनीती ठरविण्यात येणार आहे. बैठकीदरम्यान विरोधकांची एकजूटही दिसून येणार आहे. मात्र, पाटण्यात ही बैठक कुठे होणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
राज्याभिषेक झाला, अहंकारी राजा जनतेचा आवाज दाबतोय; राहुल गांधींचा हल्लाबोल
एनडीएपासून फारकत घेतल्यापासून मुख्यमंत्री नितीश कुमार भाजपविरोधी पक्षांच्या नेत्यांच्या सतत भेटीगाठी घेत आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर लवकरच बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळी ही बैठक कुठे होणार हे सांगण्यात आले नव्हते. तेव्हापासून भाजपविरोधी पक्ष एकाच व्यासपीठावर कधी दिसणार, असा प्रश्न उपस्थित होत होता. आता या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे सर्व नेते एकाच मंचावर दिसणार आहेत.
Terrorists Killed : मणिपूरमध्ये भारतीय जवानांकडून 30 दहशतवाद्यांना कंठस्नान…
पटना येथे 12 जून रोजी होणाऱ्या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन उपस्थित राहणार असल्याचे समजते. तसेच सीपीएम नेते डी राजा आणि सीताराम येचुरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यासह विरोधी पक्षांचे अनेक नेते या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.