मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यादरम्यान मोठी घोषणा केलीय. अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार असून महाराष्ट्र भवनाला ‘हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ (Balasaheb Thackeray) असं नाव देण्यात येणार आहे. एकनाथ शिंदे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ य़ांच्याकडे अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागेची मागणीही केली असून या मागणीला योगी आदित्यनाथ य़ांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
Ajit Pawar : गौतम अदानींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं योग्य नाही
पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अयोध्येत प्रभु रामाचं मंदिर झालं पाहिजे ही अनेकांची इच्छा होती. तसेच जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटलं पाहिजे, हे दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच स्वप्न होतं. ते स्वप्न आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं आहे.
श्रीरामाकडे काय मागणं मागितलं ? ; शिंदेंनी सांगितलं, महाराष्ट्रात परत जाणार पण..
शिंदे दोन दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. राज्यात कालपासून ठिकठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस झाला. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.
विरोधकांनी ही संधी साधत शिंदेंवर हल्लाबोल केला. शेतकरी संकटात असताना यांचा अयोध्या दौरा सुरु आहे, अशी टीका होत होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले.
पंढरपूच्या वारीसाठी तुकाराम महाराजांच्या पालखीचे नियोजन, कार्यक्रम जाहीर
दरम्यान, काही लोकांना हिंदूत्त्वाची अॅलर्जी असून बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्त्वाचे विचार शिकवले आहेत. त्यासोबतच इतर धर्माचा अपमान करणारे आमचे हिंदुत्त्व नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.
2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात देशात हिंदुत्त्वाचे सरकार स्थापन झाले, पंतप्रधान मोदींमुळेच हिंदुत्त्वाचा जागर झाल्याचं म्हणत त्यांनी मोदींविषयी गौरवोद्गार काढले आहेत.