Ajit Pawar : गौतम अदानींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं योग्य नाही
ajit pawar on gautam adani : हिंडेनबर्ग अहवालानंतर (Hindenburg Report) देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदांनींना ( Gautam Adani) टार्गेट केलं जातं आहे. अदानींची जेपीसी मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. या प्रकरणावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात चांगलीच जुपली आहे. मोदी आणि अदांनी विरोधात कॉंग्रेसने देशभर आंदोलन केली. संपूर्ण देशात अदानी आणि हिंडेनबर्ग प्रकरणावर चर्चा सुरू असतांना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी अदानी प्रकरणाची चौकशी जेपीसी (JPC) मार्फत करण्याची गरज नाही, त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची चौकशी समिती पुरेशी आहे, असं विधान केलं होतं. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही मोठं विधान केलं. अदानींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं योग्य नाही, असं ते म्हणाले.
राहुल गांधी हे हिंडेनबर्ग अहवालानंतर अदांनीना लक्ष करत आहेत. तर शरद पवार यांनी अदांनीना सॉफ्ट कॉर्नर दिला आहे. शरद पवारांनी एक वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी अदानी प्रकरणी जेपीसीद्वारे चौकशी करण्याची गरज नससल्याचं सांगितलं होती. जेपीसीने हा प्रश्न सुटणार नाही. त्यातून सत्यता बाहेर येणार नाही, त्याऐवजी सुप्रीम कोर्टाने एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात निवृत्त जज असणार आहेत. त्यामुळं जेपीसीपेक्षा सुप्रीम कोर्टाच्या समिती मार्फत चौकशी व्हावी, असं सांगत त्यांनी जेपीसी नेमण्यास विरोध केला होता. पवार म्हणाले होते की, आम्ही हिंडेनबर्ग कंपनीचं नाव देखील कधी ऐकलं नाही. त्या कंपनीच्या रिपोर्टमध्ये अदानींना टार्गेक केलंलं दिसतं, असं ते म्हणाले. त्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. त्यामुळं पवारांच्या भूमिकेविषयी आश्चर्य व्यक्त केलं जातंय. अनेकांनी पवारांवर जोरदार हल्लाबोल केला होता.
मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर हल्ला : रावणराज चालवले… म्हणूनच जनतेने त्यांना हटवले!
या प्रकरानंतर आता अजित पवार यांनी शरद पवारांच्या भूमिकेविषयी भाष्य केलं आहे. अजित पवार म्हणाले की, शरद पवार जे बोलले तीच आमची आणि आमच्या पक्षाची अधिकृत भूमिका आहे. शरद पवार हे आमचे सर्वोच्च नेते आहेत. त्यांनी भूमिका मांडल्यानंतर आम्ही त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. त्यांच्या भूमिकेवर आक्षेप घेऊ शकत नाही. शरद पवारांची भूमिका हीच आमच्या पक्षाची भूमिका असल्याचं त्यांनी सांगिलंत.
यावेळी बोलतांना अजित पवारांनी गौतम अदानी यांची पाठराखनही केली आहे. ते म्हणाले की, अजित पवार आणि गौतम अदानी एकत्र असलेला एक फोटो ट्विटरवर व्हायरल होत आहे. याविषयी त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी सवाल केला. त्यावर अजित पवार म्हणाले की, माझा गौतम अदानी यांच्या सोबतच फोटो कुणीतरी ट्विट केला आहे. मी काही अंडरवर्ड डॉनसोबत तर फोटो काढला नाही ना… आणि लगेच अदानींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं योग्य नाही, असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, कोणी आमच्यावर ट्विटरवरून टीका केली म्हणजे, आमच्या अंगाला काही भोकं पडत नाहीत. प्रत्येकाच्या ट्विटला उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही. असे तर रोज हौसे, नौसे ट्विट करत राहणार… मग प्रत्येकाच्या ट्विटला मी उत्तर देऊ का? मी कुणाला उत्तर द्यायला बांधील नाही, असे ते म्हणाले.