Download App

एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, CM फडणवीसांचा निर्णय अन् शिंदेंचा ‘मित्र’ महत्वाच्या पदावरुन दूर

Devendra Fadnavis : राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन झाले आहे. मात्र सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  • Written By: Last Updated:

Devendra Fadnavis : राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन झाले आहे. मात्र सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कोल्ड वॉर सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘मित्रा’ च्या उपाध्यक्ष पदावरुन एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या व्यक्तीला हटवण्याचा निर्णय घेतला आहे.

नीती आयोगाप्रमाणे (NITI Aayog) महाराष्ट्र सरकारने देखील राज्यात एक आयोग स्थापन केले आहे. महाराष्ट्र इन्फॉर्मेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन संस्था (Maharashtra Information and Transformation Institute) म्हणजेच मित्रा असं या आयोगाचे नाव आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आयोगाच्या उपाध्यक्ष पदावर अजय अशर या बिल्डरची नियुक्ती केली होती मात्र आता या बिल्डरला हटवण्याचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्क मानला जात आहे.

माहितीनुसार, बिल्डर अजय अशर हे ठाण्यातील बडे प्रस्थ असून एकनाथ शिंदे यांचे खास मित्र आहे. एकनाथ शिंदे यांनी आमदार झाल्यानंतर ठाण्यातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प किंवा रिडेव्हलपिंगचे प्रोजेक्टमध्ये अशर यांना प्राधान्य दिले आहे. तर मुख्यमंत्री असताना शिंदे यांनी त्यांना मित्राच्या उपाध्यक्षपदी नियुक्त केले होते.

वीरेंद्र सेहवाग मोठ्या संकटात, लहान भावाला पोलिसांनी केली अटक; नेमकं काय घडलं?

तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आयोगाच्या उपाध्यक्ष पदावर राष्ट्रवादी नेते आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) , भाजप नेते राणा जगजितसिंह पाटील (Rana Jagjit Singh Patil) तसेच राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांची उपाध्यक्ष पदावर नियुक्ती केली आहे. तर या आयोगाच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे.

follow us