कांदा कापल्यावरही यांना अश्रू येणार नाहीत; आंदोलन करणाऱ्या विरोधकांवर फडणवीसांची टीका

विरोधकांचं आंदोलन हे राजकीय आंदोलन आहे. कांदा कापल्यावरही अश्रू येणार नाहीत अशी लोक आंदोलन करतायत असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

News Photo   2026 05 26T143229.406

कांदा कापल्यावरही यांना अश्रू येणार नाहीत; आंदोलन करणाऱ्या विरोधकांवर फडणवीसांची टीका

पेट्रोल आणि डिझेलच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. (CM) आज सीएनजीचे भाव वाढले. जर इराण आणि अमेरिका युद्ध पुढील काही दिवस चाललं तर त्याचे वाईट परिणाम जगातील अनेक देशांना भोगावे लागतील अशी स्थिती आहे.अशातच कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मोठ संकट आलं आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने कांद्याला भाव मिळावा यासाठी आंदोलन पुकारलं आहे. याबाबद बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांवर जोरदार टीका केली आहे.

विरोधकांचं आंदोलन हे राजकीय आंदोलन आहे. कांदा कापल्यावरही अश्रू येणार नाहीत अशी लोक आंदोलन करतायत असा टोलाही त्यांनी लगावला आहे. उद्या दिल्लीत कांद्यासंदर्भात बैठक आहे अशी माहितीही त्यांनी दिली आहे. दरम्यान, कांद्याच्या मुद्द्यावर आमदार रोहित पवार आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.शेतकऱ्यांच्या कांद्याला हमीभाव मिळावा म्हणून आज शेतकऱ्यांची एकजूट झाली. शेतकरी संघटनेसह विरोधी पक्षाचे नेते उपस्थित आहे. कांद्याला 5 ते सहा रुपये भाव मिळत आहे. हा दर परवडणारा नाही 18 रुपये उत्पादन खर्च आहे असं रोहित पवार म्हणाले.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कधी न्याय मिळणार?, संघटनांचे पदाधिकारी अन् कार्यकर्ते आक्रमक

केवळ घोषणा, कांदा खरेदी कुठे सुरु आहे?

सरकारने शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणार अशी घोषणा केली. पण कांदा खरेदी कुठे सुरु आहे? असा सवाल अंबादास दानवे यांनी केला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सातत्याने कांदा भाव प्रश्नी आवाज उठवला. यावरून सगळीकडे आंदोलने झालेली आहेत. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि इतर ठिकाणी आंदोलने झाली.

सरकारने फक्त घोषणा केली. पण कांदा खरेदी कुठे सुरुच झालेली नाही. नाफेडने येऊन कांदा खरेदी करावा. एक क्विंटल तरी कांदा खरेदी झाली का? असा सवाल त्यांनी केला. आधी १,२०० आणि त्यानंतर मग १,५०० रुपये जाहीर केले. पण कांदा घेतात कुठे? शेतकऱ्यांकडील कांद्याची खरेदी व्हावी. कांद्याची खरेदी केंद्रे आधी सुरु करायला हवीत. कांद्याला २ हजार रुपये भाव मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.

Exit mobile version