Download App

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा अहमदनगरमध्ये हल्लाबोल! विरोधकांच इंजिन बंद म्हणत रावणरुपी लंकेचं दहन करण्याची टीका

  • Written By: Last Updated:

Sujay Vikhe Patil Nomination filed From Ahmednagar Lok Sabha : आपली गाडी मोदींच्या इंजिनाची गाडी आहे तर दुसऱ्या बाजूला राहुल गांधींच्या इंजिनाची गाडी आहे. परंतु, राहुल गांधींना कुणी इंजिन मानायला तयार नाहीत. तसंच, शरद पवार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, एमके स्टॅलीन, उद्धव ठाकरे हे सर्वजण म्हणतात आम्ही इंजिन आहोत. परंतु, यापैकी कुणाच्याच गाडीत बसण्यासाठी लोक तयार नाहीत असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Ahmednagar Lok Sabha) यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. ते अहमदनगर लोकसभा महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजीत केलेल्या प्रचार सभेत बोलत होते. (Devendra Fadnavis) यावेळी व्यासपिठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रविण दरेकर, आमदार संग्राम जगताप माजी मंत्री राम शिंदे, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

अहमदनगरचं नाव आहिल्यानगर होणार

आपलं एक मत म्हणजे मोदींना मत. आपलं सुजय विखेंना मत म्हणजे मोदींना मत. त्यामुळे मोदींचे हात बळकट करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील तरुण तडपदार खासदार म्हणून सुजय विखेंना निवडून द्या असं आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना केलं. दरम्यान, या जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्याचं काम राज्य सरकारने केलं आहे. आता तिसऱ्यांदा मोदी पंतप्रधान झाल्यावर आणि सुजय विखे खासदार झाल्यानंतर पहिलं काम काय होणार तर ते अहमदनगरचं नाव आहिल्यानगर होणार, असं आश्वासनही फडणवीस यांनी उपस्थितांना दिलं.

 

नाटक करून कोणी निवडून येत नाही

याच सभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधाकांवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीच्या रावणरुपी असलेल्या लंकेचं दहन करून सुजय विखे यांना मोठ्या मताधिकाने निवडून द्या. कारण नाटक करून कोणी निवडून येत नाही. त्यासाठी कामच करावं लागतं जे सुजय विखे यांनी केलेलं आहे अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे उमेदवार असलेल्या सुजय विखे यांना पाठबळ देत महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले निलेश लंके यांच्यावर जोरदार प्रहार केला.

 

राहुल गांधी स्वप्नातही पंतप्रधान होणार नाहीत

गेली दोन टर्म लोकांनी विश्वास ठेवून पंतप्रधानपदी मोदींनाच विराजमान केलं आणि तिसऱ्यांदा देखील मोदींनाच पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करणार आहेत. कोणी स्वप्नात देखील विचार करू नये की राहुल गांधी हे पंतप्रधान होतील. विरोधक कितीही एकत्र आले तरी मोदींच्या नाकाचीही सर इंडिया आघाडीला येणार नाही, अशा शब्दांत शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली.

follow us