CM Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर (Udhhav Thackeray) टीका केली. ते म्हणाले की, ते दिसतात तसे इनोसंट नाहीत, त्यामागे अनेक चेहरे आहेत. लग्न एका सोबत, हनीमून एका सोबत असं त्यांनी केलं आहे. आज शिवसेनेच्या कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या महा अधिवेशनामध्ये बोलत होते.
दंगल फेम अभिनेत्री सुहानी भटनागरचे निधन, ‘या’ कारणामुळे 19 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की, जे बाळासाहेबांचा वारसा सांगतात त्यांच्याकडे राम मंदिर निर्माण नंतर एक शब्दही बोलण्याची हिम्मत नाही. मग बाळासाहेबांचा विचार वारसा आणि हिंदुत्व सांगण्याची तुमची नैतिकता नाही. तुम्हाला अधिकारही नाही. तसेच आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसैनिक शिवसेनेमध्ये का येत आहेत? कारण ठाकरेंकडून एखाद्या व्यक्ती जोपर्यंत त्यांच्याकडे आहे तोपर्यंत चांगला आहे. नंतर गेला की तो गद्दार होतो तो कचरा होतो. पण एक दिवस हेच कार्यकर्ते आणि महाराष्ट्र तुम्हाला कचऱ्यात जमा केल्याशिवाय राहणार नाही.
भाजपकडून नगर दक्षिण लोकसभेचे तिकीट कोणाला? विखेंनी स्पष्टच बोलून दाखवलं
हम दो हमारे दो अशी त्यांची परिस्थिती आहे. पण आत्मपरीक्षण करणार की नाही. आमच्यावर पन्नास खोक्यांची टीका करतात मात्र यांना खोके पुरत नाही तर कंटेनर लागतात याचा सर्वात मोठा साक्षीदार मी आहे. शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह आणि पक्ष जेव्हा आम्हाला मिळाले त्यावेळी आम्हाला ठाकरेंचं पत्र आलं की, शिवसेनेच्या खात्यातील 50 कोटी आम्हाला पाहिजे. ते आम्हाला द्यावेत. त्यावर मी क्षणाचाही विचार न करता म्हटलं की त्यांना बाळासाहेबांचे विचार नको पैसा हवा आहे. तो तातडीने देऊन टाका त्यामुळे आमच्यावर 50 खोक्यांचा आरोप करणारे तुम्ही पन्नास खोके मागताना तुम्हाला जनाची नाही तर मनाची तरी काही वाटली पाहिजे होती.
Jiya Shankar : जिया शंकरच्या किलर स्माईलची चाहत्यांना भुरळ!
बाळासाहेब असताना मातोश्री एक पवित्र मंदिर होतं ती आता एक उदास हवेली झाली आहे. जिथे वाघाचे दार काही फुटायचे तिथे रडगाणे आणि शिव्या शापाचा आवाज येतो. बाळासाहेब शिवसैनिकांचा दैवत होतो ते तुम्ही विकून टाकलं. सत्तेसाठी तुम्ही त्यांचे विचार सोडले. ठाकरेंना 2004 पासून सत्तेचा मोह होता ज्याचे अर्जुन खोतकर ही साक्षीदार आहेत. ठाकरे जसे दिसतात तसे नाही त्यांच्या इनोसंट चेहऱ्यामागे अनेक चेहरे आहेत. लग्न एका सोबत, हनीमून एका सोबत असं त्यांनी केलं आहे. हे मी संसदीय शब्द बोलतोय, मी कधीही असंसंदीय शब्द बोलत नाही निलम ताई सांगतील. म्हणूनच त्यांनी पवारांना स्वतःच नाव मुख्यमंत्री म्हणून सुचवायला सांगितलं. शरद पवारांनी पवारांनी सांगितलं तुम्हाला मुख्यमंत्री व्हावे लागेल चेहरा अगदी रडविलेला होता तेव्हा मी म्हणालो तुम्ही पुढे व्हा मी मागे आहे.