देशभरात सध्या हवामान वेगाने बदलतय. (India) दक्षिण भारतात केरळ आणि तमिळनाडू राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उत्तर मध्य भारतात हवेतील गारवा चांगलाच वाढतोय. राज्यात आता कडाक्याचा थंडीला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यात थंडी झपाट्याने वाढल्याने जागोजागी शेकोट्या दिसत आहेत.
पावसाचे चार महिने संपल्यानंतर बंगालच्या उपसागरात तयार झालेलं मोंथा चक्रीवादळ त्यानंतर अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्ट्यामुळे मुंबई व राज्यभरात पाऊस सुरू होता. परतीच्या पावसाला झालेला विलंब, अतिवृष्टी, पूर परिस्थिती या सगळ्या घडामोडींमुळे यंदा हिवाळा थोडा उशिरा सुरू झाला आहे.
त्या लाभार्थी महिलांसाठी करणार बदल; लाडकी बहिण योजनेबाबत मंत्री तटकरेंची मोठी माहिती
गेल्या तीन ते चार दिवसांपासून विदर्भात किमान तापमानाचा पारा वेगाने घसरत आहे . गेल्या 24 तासात 2 ते 3 अंशांनी तापमान घसरले असून गोंदिया जिल्ह्यात 10.5 अंश तापमान नोंदवण्यात आलं आहे . जळगाव जिल्ह्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून 9.2 अंश सेल्सियसवर पारा गेलाय . मराठवाड्यातही बहुतांश ठिकाणी 15 अंशाखाली गेलाय . आज कुठे किती तापमान होतं पाहूया .
छत्रपती संभाजीनगर – 12.4°C
बीड – 11.4°C
दहानू – 17.4°C
हरनाई – 21.6°C
जळगाव – 9.2°C
जिऊर (जिउर/जुर) – 10.5°C
कोल्हापूर – 16.9°C
महाबळेश्वर – 12.5°C
मालेगाव – 11.2°C
मुंबई (सांताक्रूझ) – 19.8°C
नाशिक – 10.7°C
धाराशिव – 14.0°C
परभणी – 13.5°C
रत्नागिरी – 18.4°C
सांगली – 15.1°C
सातारा – 13.5°C
अहमदनगर – 11.4°C
सोलापूर – 16.4°C
उदगीर – 14.0°C
