Congress and Vanchit Bahujan Alliance formula decided : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. मुंबईला(Mumbai) महापालिकेसाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीकडून आज जागावाटप जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई महापालिकेसाठी वंचित(VBA) आणि काँग्रेसमध्ये(Congress) मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देखील या दोन्ही पक्षांशी पडद्यामागून चर्चा सुरू आहे. मात्र वंचित आणि काँग्रेसने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईत खूप कमी जागा दिल्या असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुंबईत शरद पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याच्या चर्चांना देखील उधाण आलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या आघाडीची घोषणा होण्याची आज शक्यता वर्तवली जात आहे. या आघाडीची काँग्रेसकडून वंचितला 62 जागा देण्यात आल्या असून काँग्रेसची 156 जागा लढण्याची तयारी आहे. मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला फक्त 9 जागा सोडण्यात आल्याची माहिती आहे. त्याचप्रमाणे 2017 च्या निवडणुकीत निवडून आलेल्या एका जागेचा त्याग करण्यासाठी काँग्रेसची तयारी असल्याचं देखील बोललं जात आहे. काँग्रेसपेक्षा शिवसेना उबाठा त्यांना जास्त जागा देत असल्यानं ठाकरेंसोबत जाण्यासाठी देखील राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.
BMC Election-मुंबईत महायुतीमध्ये 207 जागांवर सहमती, शिवसेनेच्या वाटेला किती जागा ?
याबाबत आज दिवसभरात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर 16 जानेवारीला 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. पुढील आठवड्यातील मंगळवार हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
