लोकशाही फक्त म्हणायला शिल्लक; माध्यमांवर सत्ताधाऱ्यांचा अंकुश, जयदेव डोळे यांचं प्रतिपादन
विवेकानंद महाविद्यालयात आयोजित प्रगतिशील साहित्य संमेलनात 'माध्यमं आणि लोकशाही प्रजासत्ताकात विचार स्वातंत्र्याची आवश्यकता' हा परिसंवाद झाला.
लोकशाही फक्त म्हणायला शिल्लक आहे. (Sambhajinagar) कारण, लोकशाही ज्या खांबांवर आणि ज्या संस्थांवर उभी आहे त्या संस्था हळू हळू कमकुवत आणि संपवण्याच काम सत्ताधाऱ्यांकडून होत आहे असं परखड मत ज्येष्ठ समाजवादी विचावंत जयदेव डोळे यांनी व्यक्त केलं. ते आज शनिवार (दि. 27)रोजी दुपारी विवेकानंद महाविद्यालयात आयोजित प्रगतिशील साहित्य संमेलनात ‘माध्यमं आणि लोकशाही प्रजासत्ताकात विचार स्वातंत्र्याची आवश्यकता’ या विषयावरील परिसंवादात बोलत होते.
पुढे बोलताना डोळे म्हणाले, टेलिव्हिजनच्या कॅमेऱ्याला कायम एक ऍक्शन हवी असते, कुणी विचारी माणूस पुस्तक वाचत बसलाय असं चित्र आपण कधीच या माध्यमांवर पाहिलेलंल नाही. या प्रकारचं काही या माध्यमांवर होतही नाही, यांना कायम सनसनाटी हवी असते. त्याचबरोबर सोशल मीडिया म्हणून जे काही माध्यम म्हणतो ते फेसबुक हे विचारी लोकांसाठी नाहीच, ते जगातली अनेकांची सरकार उलथवून टाकण्याचं एक साधन झालं आहे असंही डोळे यावेळी म्हणाले.
ही फेसबुक, ट्विटर अशी माध्यमसंस्थेची मालक लोकं व्यावसायिक आहेत. त्यांनी हे साधन विचारी माणसांसाठी काढलेलं नाही. सोशल मीडियाच वापर करणारे सर्वात जास्त लोक भाजपचे आहेत. पण मुळात झुकेरबर्ग आणि मस्क ही उद्योजक उजव्या विचारण्याची लोक आहेत. अनेक प्रश्नावर पांघरून घालणारी ही लोक आहेत. यामध्ये सांस्कृतिक राष्ट्रवाद फोफावला असून तो पोटापाण्याचे प्रश्न दिसू देत नाही असंही जयदेव डोळे यावेळी म्हणाले.
या प्रगतिशील साहित्य संमेलनातील परिसंवादात जयदेव डोळे हे अध्यक्ष होते तर डॉ. किशोर शिरसाट, पत्रकार दत्ता कानवटे, पत्रकार रोशनी शिंपी आणि सोशल मीडिया प्रभावक अनिकेत म्हस्के हे सहभागी होते. यावेळी छत्रपती संभाजीनगरमधील साहित्यप्रेमी आणि पुस्तक प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
