गुगल मॅपने गोंधळ वाढवला, यूपीएससीचे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित

गुगल मॅपने गोंधळ वाढवला, यूपीएससीचे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित

UPSC Exam : आज संपूर्ण देशात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणेजच यूपीएससीच्या परीक्षा (UPSC Exam 2024) होत आहे. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी यूपीएससीची परीक्षा देत असून गेल्या काही महिन्यांपासून या परीक्षेसाठी दिवस रात्र कष्ट घेत आहे मात्र आज काही विद्यार्थ्यांसोबत एक धक्कादायक घटना घडली आहे.

माहितीनुसार, काही विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र छ. संभाजीनगरातील विवेकानंद कॉलेज (Vivekananda College) या ठिकाणी आले होते. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून या परीक्षेसाठी विद्यार्थी परीक्षा केंद्रावर आले आहे मात्र इतर जिल्ह्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना विवेकानंद महाविद्यालय माहित नसल्याने त्यांनी गुगल मॅपची (Google Map) मदत घेतली मात्र गुगल मॅपवर मूळ केंद्रापासून 11 किलोमीटरचे केंद्र दाखवत असल्याने या विद्यार्थ्यांची दिशाभूल झाली आणि अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर (Exam Center) वेळेत पोहचू शकले नाहीत.

या विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर येण्यास उशीर झाल्याने त्यांना परिक्षा केंद्रामध्ये प्रवेश देण्यात आला नाही. यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित रहावे लागले आहे.

नांदेड जिल्ह्यातून आज यूपीएससीच परीक्षा देण्यासाठी एक विद्यार्थी छ. संभाजीनगर जिल्ह्यात आला होता. त्याने गुगल मॅपवर परीक्षा केंद्र टाईप केला असता गुगल मॅपने त्यांना वाळूजमधील विवेकानंद कॉलेज हे परीक्षा केंद्र दाखवले मात्र तिथे गेल्यावर तुम्ही चुकीच्या ठिकणी आले आहेत अशी माहिती त्यांना देण्यात आली यामुळे परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी त्यांना काही मिनिटे उशीर झाल्याने त्यांना आज परीक्षेपासून वंचित रहावे लागले आहे.

ठरलं! गौतम गंभीर होणार टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक, ‘या’ दिवशी होणार घोषणा

अशीच घटना जालना जिल्ह्यातील एका विद्यार्थी सोबत देखील घडली आहे. त्यांना देखील गुगल मॅपने चुकीचा ऍड्रेस दाखवल्याने ते परीक्षा केंद्रावर 2 मिनटे उशिरा पोहोचल्याने त्यांना परीक्षेपासून वंचित रहावे लागले आहे. यामुळे आयोगाने या प्रकरणात योग्य ती दाखल घ्यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज