Download App

‘आता सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जायची वेळ…’; नाना पटोलेंचा खोचक टोला

मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी, असं सगळं झालं आहे. आता सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जायची वेळ आली. - पटोले

  • Written By: Last Updated:

Nana Patole : राज्याचे अर्थमंत्री अजित पवा (Ajit Pawar) यांनी काल अर्थसंकल्पातून अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. लाडकी बहीण ही योजला सुरू केली. शेतकरी, महिलांसाठी मोठ्या योजना जाहीर केल्या आहेत. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली. या योजनेनुसार आता राज्य सरकार ज्येष्ठ नागरिकांना देवदर्शन घडणार आहे. दरम्यान, यावरून आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) सरकावर जोरदार टीका केली.

पोर्श कार अपघात प्रकरणावरून राज ठाकरे संतापले, म्हणाले, ‘हे कोणते न्यायाधीश? पैशांची देवाणघेवाण…’ 

नाना पटोलेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. पटोलेंनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेवरून सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, आता या सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातील जनतेने या सरकारला त्यांची जागा दाखवून दिली आहे. बजेट सादर झालं, घोषणा केल्या गेल्या, पण पैसे कुठून आणणार? याचे उत्तर सरकारकडे नाही. घोषणांचे पालन पूर्णपणे शून्य आहे. सरकार आता खोटं बोलून नेरेटिव्ह सेट करत आहे, अशा शब्दात पटोलेंनी हल्लाबोल केला.

राहुल गांधी पंतप्रधानपदाचा चेहरा असते तर 25 ते 30 जागा वाढल्या असत्या; राऊतांचे मोठे विधान 

बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी
पुढं बोलतांना ते म्हणाले, वारकरी पंथाचे लोक येऊन गेली. वारकरी पंथाला सुविधा देण्याऐवजी या प्रथेला तोडता कसे येईल, याचा प्रयत्न या सरकारने कला. सरकार निरर्थक गवगवा करत आहे. मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजना म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी, असं सगळं झालं आहे. या सरकारचे वास्तविक दर्शन आम्ही मांडणार,असा इशाराही पटोलेंनी दिला.

दरम्यान, वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीटच्या पेपर फुटीचे लोण महाराष्ट्रात आले असून याप्रकरणी लातूरमधून काही जणांना अटक करण्यात आली आहे. पेपर फुटणे ही गंभीर बाब असून अशा पेपर फुटीमुळं शेकडो होतकरू विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी राज्य सरकार पेपर फुटीविरोधात कडक कायदा करणार आहे का? असा सवाल नाना पटोले यांनी केला.

follow us