Download App

नाना पटोलेंनी सरकारला दिलं नवीन नाव! म्हणाले, ईडीच्या धाकाने…

सत्ताधारी सरकारवर टीका करताना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारला नवीन नाव दिलं आहे. राज्यात ईडीच्या धाकाने ई, डी अन् ए सरकार स्थापन झाल्याची टीका करीत पटोले यांनी सरकारला नवीन नावचं दिलं आहे. दरम्यान, राज्यात आधी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं. त्यात आता अजित पवार सहभागी झाल्याने ईडीच्या धाकाने ई, डी अन् ए सरकार स्थापन झाल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत.


अजित पवार एकटेच नाही, तर ‘या’ नेत्यांसोबत दिल्लीत दाखल, खातेवाटपाचा तिढा सुटणार?

नाना पटोले म्हणाले, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठकीत कानमंत्र दिला आहे. त्यानूसारच काँग्रेसचे सर्वच नेते पदाधिकारी राज्यात काम करणार आहेत. राज्यातल सरकार असैंविधानिक असून असैंविधानिक सरकारची परिस्थिती आपण पाहिली पाहिजे, सर्वोच्च न्यायालयानेही हीच भूमिका घेतलीय. त्यामुळे राज्यात आता ईडीच्या धाकाने ईडीए असं सरकार स्थापन झालं असल्याचं ते म्हणाले आहेत.

अजित पवार गटाला दिलेले आश्वासन पूर्ण होत नसल्यानं खातेवाटपाचा तिढा; रोहित पवारांचे टीकास्त्र

तसेच हे सरकार स्थापन झाल्यापासून अद्याप मंत्रिमंडळ विस्तार नाही. राज्य सरकारच्या कारभारामुळे राज्यातील जनतेचं मोठं नूकसान होत आहे. प्रस्थापित सरकारने महाराष्ट्र पाच वर्ष मागे नेण्याचं पाप भाजपने केलंय, महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलायं हे जनता आता त्यांना विचारत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

महिला आयोग अध्यक्षपदावरुन चाकणकरांचं निलंबन करा; राष्ट्रवादी शरद पवार गटाची मागणी

पहिल्यांदा भाजपचे 105 आमदार जनतेने निवडून दिले आहेत. जनतेला आता चुकल्यासारख वाटत आहे. त्यामुळे पुढील काळात भाजपला सत्तेतून बाहेर काढणं हे जनतेचं एकमेव काम असून हे सरकार तीन तिघाडा अन् कान बिघाडा असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, कोरोना काळात महाविकास आघाडी सरकारने लोकांचा जीव वाचवण्याचं काम केलं असून भाजप जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करायचं सोडून रोज काही ना काही भानगड काढत त्यावर चर्चा करीत असल्याचंही ते म्हणाले आहेत.

दिल्लीत काल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंसह, राहुल गांधी, के.सी. वेणुगोपाल यांची उपस्थिती होती. तर महाराष्ट्र काँग्रेसच्या एकूण 25 नेत्यांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालंय. महाराष्ट्रातील अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, सतेज पाटील, वर्षा गायकवाड, सुशीलकुमार शिंदे आदी नेत्यांनी हजेरी लावली होती. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीविषयी चर्चा झाल्याचं काँग्रेस नेत्यांकडून सांगण्यात आलं आहे.

Tags

follow us