अजित पवार गटाला दिलेले आश्वासन पूर्ण होत नसल्यानं खातेवाटपाचा तिढा; रोहित पवारांचे टीकास्त्र

अजित पवार गटाला दिलेले आश्वासन पूर्ण होत नसल्यानं खातेवाटपाचा तिढा; रोहित पवारांचे टीकास्त्र

2 जुलै रोजी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालेल्या राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आठवडा उलटला तरीही नवनियुक्त मंत्र्यांना खातेवाटप झालेले नाही. दरम्यान, खातेवाटपाच्या चर्चा सुरू असून पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं सांगितल्या जातं. मात्र, खातेवाटपाचा तिढा काही सुटला नाही. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजप (BJP) आपली प्रवृत्ती हळूहळू दाखवायला लागला. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाला जे आश्वासन देण्यात आले होते, ते पूर्ण होत नसल्यान हा तिढा निर्माण झाल्याचं ते म्हणाले. (Non fulfillment of promises given to Ajit Pawar group  Rohit Pawar Criticism bjp)

सीएम एकनाथ शिंदे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे मंगळवारी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खातेवाटपावर एकमत होऊ शकले नाही. दोन खात्यांवरून तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळं मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाला विलंब होत आहे. परिणामी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना बिनखात्याचे मंत्री म्हणून वावरावे लागते. याविषयी रोहित पवार माध्यमांशी बोलतांना म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नऊ मंत्र्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होतं मंत्रिपदाची शपथ घेतली. त्या मंत्र्यांना अद्यापही खातेवाटप करण्यात आलं नाही. भाजपच्यावतीने अजित पवार यांच्या गटाला जे आश्वासन देण्यात आले होते, ते पूर्ण होत नसल्यामुळे तिढा निर्माण झाल्याचं ते म्हणाले.

भारत 2023 चा विश्वचषक जिंकू शकणार नाही, युवराज सिंगचा मोठा दावा 

ते म्हणाले, भाजप हा त्यांच्याच पार्टीमधील लोकनेते ते टिकू देत नाहीत. मग बाहेरून आलेल्यांना ते कसे टिकू देतील? एकनाथ शिंदे यांची ताकद कमी भाजपने कमी केली. शिंदेची ताकद कमी करायला भाजपाला एक वर्ष लागलं. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपने शिवसेनेतेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामाध्यमातून फुट पाडली. त्यांचा उपयोग भापजने केला होता. शिंदे यांच्या सोबत आलेल्या नऊ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. त्यानंतर एक वर्ष होऊन सुद्धा अद्यापही त्यांच्यासोबत आलेल्या इतर आमदारांना मंत्रिपद मिळाले नाही, भाजपने आता राष्ट्रवादीच्या बाबतीतही आपली प्रवृत्ती दाखवायला सुरूवात केल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, राज्यातील सामान्य लोकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. जनतेसमोर अनेक समस्या उभ्या आहे. अनेक भागात शेतकरी पाऊस न पडल्याने त्रस्त झाला आहे. तर दुसरीकडे राज्यकर्ते खुर्चीकरिता एकमेकांसमोर उभे आहे. चांगल्या दर्जेदार खातं आपल्याला मिळावे याकरिता तिन्ही पक्षांमध्ये स्पर्धा सुरू असल्याची टीका त्यांनी केली.

अजित पवार खातेवाटपाची चर्चा करण्यासाठी दिल्लीत गेले. याविषयी विचारले असता ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासून महाराष्ट्राचा इतिहास आहे की, दिल्ली समोर केव्हाही महाराष्ट्राता सह्याद्री झुकलेला नाही. सध्याचे केंद्रातील नेतृत्व हे महाराष्ट्राला दिल्ली समोर झुकवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला शरद पवारांनी विरोध केला आहे. त्यामुळे मी शरद पवारांसोबत आहे. महाराष्ट्रला दिल्लीसमोर कधी आम्ही झुकू देणार नाही. आज जे सत्तेत गेले, त्यांनीही महाराष्ट्राला झुकवू नये, असं रोहित पवार म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube