Download App

मोदी ना हिंदूंचे, ना मुस्लिमांचे, ना देशाचे; नाना पटोलेंचा घणाघात

Nana Patole On PM Modi : केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपने (BJP)मागील 9 वर्षात जनतेसाठी काहीही केलेलं नाही. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी (Narendra Modi) सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहेत. देशाची (India)संपत्ती विकून देश चालवणारा पंतप्रधान देशाने पहिल्यांदाच पाहिला आहे. नरेंद्र मोदींचा खरा चेहरा देशातील जनतेला आता कळाला आहे. मोदी हे, ना हिंदूंचे (Hindu)आहेत, ना मुस्लिमांचे(Muslims), ना देशाचे, अशी घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे (Congress)अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी केला आहे.

हलगर्जीपणा भोवला, प्रशासकाच्या हाती कारभार; ‘या’ कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त

माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, जनतेने भाजपाला केंद्रात दोनदा बहुमताने सत्ता दिली पण भाजपाने जनतेला काय दिले? याचे उत्तर देण्याची वेळ आली आहे. काँग्रेसने 60 वर्षात काय केले, सांगण्यासाठी भाजपाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. स्वातंत्र्यानंतर देशात काहीही नव्हते, सुईपासून रॉकेटपर्यंत काँग्रेस सरकारच्या नेतृत्वाखाली देशाने विकासाचे शिखर गाठले. भारताला जगात महासत्ता बनवले.

काँग्रेस सरकारच्या काळात विकासच केला नसता तर नरेंद्र मोदी आज जी देशाची संपत्ती विकत आहेत ती कुठून आली असती? काँग्रेसविरोधात सातत्याने थोतांड मांडून जनतेची दिशाभूल करण्याचे काम नरेंद्र मोदी करत आहेत, ते त्यांनी आता थांबवावे. नरेंद्र मोदींना सत्तेत येऊन 9 वर्ष झाली, तुम्ही देशासाठी काय केले? हे सांगण्याची वेळ आहे, ते तुम्ही सांगा.

काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याआधी नरेंद्र मोदी यांनी आपल्या पक्षांच्या राज्य सरकारांचा कारभार पहावा. कर्नाटकात मुख्यंमत्रीपदासाठी 2500 कोटी रुपयांचा लिलाव केला. मंत्रिपदासाठी कोट्यवधी रुपयांचा लिलाव झाला होता, हे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार (Jagdish Shettar)यांनीच सांगितले आहे.

कर्नाटकात 40 टक्के कमिशनचे सरकार आहे. त्याचे उत्तर आधी नरेंद्र मोदींनी द्यावे. काँग्रेसवर आरोप करून तुम्ही तुमची सुटका करून घेऊ शकत नाही. तुमच्या पक्षावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे उत्तर जनतेला द्या. काँग्रेसवर बिनबुडाचे आरोप करुन जनतेची दिशाभूल करु, असे जर तुम्हाला वाटत असेल तर जनतेला तुमचा खरा चेहरा समजलेला आहे हे लक्षात ठेवा, असंही त्यांना सुनावलं.

Tags

follow us