Congress Shiv Sena split : विधानसभा निवडणूक पार पडली. महायुतीला मोठ यश आलं तर दुसऱ्या बाजुला महाविकास आघाडी नेस्तनाबूत झाली. शंभर शंबरच्या आसपास जागा लढवलेली महाविकास आघाडी 50 मध्ये गारद झाली इतकी वाताहत यामध्ये झाली आहे. त्यानंतर आता महाविकास आघाडी किती दिवस भक्कम असेल याबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू आहे. (Congress) दरम्यान, शिवसेना उबाठासोबत फारकत घ्यावी असा सुर काँग्रेसमधील काही वर्गाचा आहे असं सध्या समोर आलं आहे.
Maharashtra Politics Live Update : मुख्यमंत्रीपदी भाजपचा चेहरा; एकनाथ शिंदेंचा पत्ता कट
लोकसभा निवडणूक काळात शिवसेने ठाकरे गटाच्या नेत्यांनी घेतलेल्या ताठर भू्मिकेवर काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. सांगलीच्या जागेवरून या दोन्ही पक्षातील अंतर्गत वाद विकोपाला गेला होता. सांगली मतदारसंघाती काँग्रेसची ताकद अधिक असल्याने ही जागा आपल्याला मिळावी यासाठी प्रयत्न झाले. मात्र, उद्धव ठाकरे यांनी त्या जागेबाबत काहीही भूमिक घेतली नाही. अखेर काँग्रेसचे विशाल पाटील अपक्ष लढले आणि विजयीसुद्ध झाले. त्यामुळे अशा हेकेखोर शिवसेनेच्या नेत्यांमुळे आपलं नुकसान होतंय अशी भावना काही काँग्रेसच्या नेत्यांची आहे असंही एक सूर आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीची अशी अवस्था होण्यामागे वेगवेगळी कारणं असली, तरी प्रमुख कारण आहे, नकारात्मक प्रचार. महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण योजना, ज्येष्ठांसाठी, युवकांसाठी स्टायपेड अशा वेगवेगळ्या योजना आणल्या. शेतकऱ्यांना वीज बिल माफी दिली, त्याचा मतदारांवर परिणाम झाला हे खरं आहे. पण महायुतीच सरकार हटवल्यानंतर महाराष्ट्राच्या विकासासाठी काय प्लान आहे? पर्यायी योजना काय आहेत? हे मतदार राजाला पटवून देता आलेलं नाही.