Download App

कंत्राटी भरती GR बाबत वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारा दावा; अजितदादाही टार्गेट

  • Written By: Last Updated:

मुंबई : कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करत काल (दि.20) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavsi) यांनी उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारा दावा केला आहे. त्यामुळे येत्या काळात कंत्राटी भरतीवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार जुंपण्याची शक्यता आहे. यावेळी वडेट्टीवारांनी भाजपसह अजितदादांच्या (Ajit Pawar) भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. (Vijay Wadettiwar On Contrct Basis Recruitment)

Ajit Pawar : पहाटे पाहणी दौरा का करता? पत्रकारांच्या प्रश्नावर अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

काय म्हणाले वडेट्टीवार?

कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावर बोलताना वडेट्टीवारांनी जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, याबाबत ज्यावेळी जीआर निघाला होता. त्यावेळी भाजप विरोधी पक्षात होता.या सर्व प्रकरणात स्वतःच्या कंपन्या होत्या की वाटेकरी होता म्हणून जीआर निघाला तेव्हा मूग गिळून गप्प होते का? असा गंभीर प्रश्नदेखील वडेट्टीवर यांनी उपस्थित केला आहे. आम्ही विरोध केल्याने आताच्या सरकारला हा जीआर रद्द करावा लागाला आहे. ही सत्ताधाऱ्यांची नामुष्की असल्याची टीकाही यावेळी त्यांनी केली.

अजित पवारांवर गंभीर आरोप

राज्यात हजारो पदांसाठी कंत्राटी भरतीचा जीआरवरून वडेट्टीवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहे. ते म्हणाले की, ज्यावेळी निघाला होता. त्यावेळी अजित पवार अर्थमंत्री होते असे म्हणत कोणत्या कंपन्यांना लाभ झाला हे समोर येणे आवश्यक आहे. त्यासाठी सखोल चौकशीचीदेखील त्यांनी मागणी केली.

ISRO Gaganyaan Mission : अखेर ‘गगनयाना’चे चाचणी उड्डाण यशस्वी; इस्त्रोच्या प्रयत्नांना यश

मग तुम्ही जीआर रद्दचा निर्णय का घेतला नाही?

कंत्राटी भरतीबाबत आम्ही आवाज उठवल्यानंतर तसेच रस्त्यावर उतरल्यानंतर हा जीआर रद्द झाल्याचा दावाही वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच गेल्या अडीच वर्षांपासून तुम्ही सत्तेत आहात मग हा जीआर रद्द करण्याचा निर्णय का घेतला नाही असा सवाल करत तो जीआर तुम्हीच पुढे घेऊन जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळातील काढण्यात आलेला कंत्राटी भरतीचा जीआर हा केवळ 15 संवर्गांसाठी असल्याचेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. तो जीआर बदलून तुमच्या सरकारने 134 संवर्गासाठी केल्याचा दावा करत मोठ्या प्रमाणावर कंत्राटी भरती करण्याचा निर्णय तुम्हीच घेतला आहे. त्यामुळे ठाकरे आणि पवारांनी युवकांची दिशाभूल केल्याप्रकरणी माफी मागण्याऐवजी आताच्या सरकारनेच नाक घासले पाहिजे.

follow us