ISRO Gaganyaan Mission : अखेर ‘गगनयाना’चे चाचणी उड्डाण यशस्वी; इस्त्रोच्या प्रयत्नांना यश
ISRO Gaganyaan Mission : चांद्रयान मोहिम यशस्वी पार पाडल्यानंतर इस्त्रोने सूर्याच्या दिशेने (ISRO Gaganyaan Mission) आदित्य एल 1 यान यशस्वीरित्या पाठवले. त्यानंतर आणखी एका धाडसी मोहिमेला आजपासून सुरुवात झाली. गगनयानाची पहिली चाचणी आज यशस्वी करण्यात आली. सुरुवातीला काही तांत्रिक कारणांमुळे आजचे हे उड्डाण रद्द करण्यात आले होते. त्यानंतर इस्त्रोच्या पथकाने पुन्हा प्रयत्न केले. अखेर आद सकाळी 10 वाजता या रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. आज गगनयान मोहिमेसाठी चाचणी उड्डाण टीव्हीडी1 प्रक्षेपित करण्यात येणार आले. क्रू एस्केप सिस्टम’चे प्रात्याक्षिक पहिल्या फ्लाइट टेस्ट व्हेईकल अॅबॉर्ट मिशन 1 द्वारे पाहिले जाईल. या मोहिमेचा अर्थ असा की आता इस्त्रो मानवरहित मोहिमा आणि इतर चाचण्या करण्यास सक्षम असेल.
ISRO Gaganyaan Mission : चंद्रानंतर अंतराळ करणार काबीज; ‘इस्त्रो’च्या गगनयान मोहिमेची आज पहिली चाचणी
याआधी उड्डाणासाठी फक्त पाच सेकंद बाकी असताना उड्डाण होल्ड करण्यात आले होते. यामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे इस्त्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी स्पष्ट केले. गगनयान मोहिमेतील अंतराळवीरांच्या सुरक्षेसाठी ही चाचणी अत्यंत महत्वाची मानली जात आहे. या मोहिमेत तीन सदस्यांची टीम तीन दिवसांच्या मोहिमेसाठी पृथ्वीच्या 400 किलोमीटर वरच्या कक्षेत पाठवली जाणार आहे. हे क्रू मॉडेल समुद्रात सुरक्षितपणे उतरवण्यात येईल. जर या मोहिमेत भारत यशस्वी झाला तर असे करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे. त्यामुळे आजचा दिवस भारतासाठी महत्वाचाच आहे. इस्त्रोने या मोहिमेची सर्व तयारी पूर्ण करत उड्डाण यशस्वी करून दाखवले.
नेमकं काय झालं ?
सुरुवातीला लिफ्ट ऑफ करण्याचा प्रयत्न होऊ शकला नव्हता. इंजिनचे प्रज्वलन ठरल्याप्रमाणे झाले नाही. काय चूक झाली हे शोधून काढले जाईल. आम्ही लवकरच परत चाचणी घेऊ असे इस्त्रोचे संचालक सोमनाथ यांनी सांगितले होते. सुरुवातीला सकाळी 8 वाजता लाँच होणार होते. पण, खराब हवामानामुळे वेळ 8.45 करण्यात आली. इंजिन योग्यरित्या प्रज्वलित झाले नाही. नेमकी काय चूक झाली हे शोधून काढण्यात आले. त्यानंतर सकाळी 10 वाजता यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
ISRO successfully launches Test Flight Abort Mission for project Gaganyaan
Read @ANI Story | https://t.co/GSpAfrehOc#ISRO #Gaganyaan #Testflight pic.twitter.com/oyQBOFKdjS
— ANI Digital (@ani_digital) October 21, 2023
चांद्रयान मोहिम यशस्वी
दरम्यान, भारताचे चांद्रयान 3 मिशन 23 ऑगस्ट रोजी यशस्वी ठरले होते. या दिवशी चांद्रयानाने विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरसह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केले. भारताची ही कामगिरी यशस्वी राहिली. पहिलाच देश म्हणून जगभरात नावलौकिक मिळाला. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या पाठीवर थाप टाकण्यासाठी स्वतः पीएम मोदी बंगळुरूत आले होते. येथे त्यांनी इस्त्रोतील शास्त्रज्ञांशी संवाद साधला. त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. सॉफ्ट लँडिंग ज्या ठिकाणी झाली त्या ठिकाणाला शिवशक्ती पाँइंट असे नाव दिले. चर याआधी चांद्रयान 2 मिशन जेथे क्रॅश झाले होते त्या ठिकाणाला तिरंगा पॉइंट असे नाव दिले.