कैद्यांना धर्मांतरासाठी मारहाण करणाऱ्या बीडच्या ‘त्या’ काराग्रह अधिकाऱ्याची अखेर उचलबांगडी

काराग्रह अधीक्षक पेट्रस गायकवाड धर्मांतर करण्यासाठी कैद्यांवर दबावतंत्राचा वापर करत होते. इतकंच नाही तर त्यांना बेदम मारहाण देखील करत होते.

Petros

Petros

बीडमध्ये गुन्हेगारीमध्ये पोलिसही आघाडीवर असल्याचं वारंवार दिसून आलं आहे. (Beed) येथे आता वादग्रस्त काराग्रह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. पेट्रस गायकवाड यांचा बीडमधील कार्यकाळ वादग्रस्त ठरला. त्यांच्यावर कारागृहातील कैद्यांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप देखील झाला होता. या प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती होती. त्यानंतर पेट्रस गायकवाड यांची नागपूरला बदली झाली आहे.

काराग्रह अधीक्षक पेट्रस गायकवाड धर्मांतर करण्यासाठी कैद्यांवर दबावतंत्राचा वापर करत होते. इतकंच नाही तर त्यांना बेदम मारहाण देखील करत होते, असा खळबळजनक आरोप जामिनावर बाहेर आलेल्या काही कैद्यांनी केला आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर मोठी खळबळ उडाली होती. त्याचबरोबर कारागृहातील कायद्यांकडे आढळलेला गांजा, मोबाईल यावरून देखील चर्चा होत होती. यानंतर थेट कायद्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा देखील आरोप झाला होता.

बीडमध्ये मध्यरात्री खळबळ! सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर अज्ञात टोळक्याचा हल्ला, 4 महिला गंभीर

या आणि अशा अनेक घटनांवरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तसंच, रात्री झालेल्या बीडमधील सभेत देखील आमदार पडळकर यांनी गायकवाड यांच्यावर जहरी टीका करत त्यांच्या बदलीची मागणी देखील केली होती. त्यानंतर बुधवारी (15 ऑक्टोबर) सकाळीच पेट्रस गायकवाड यांना बदलीचे आदेश मिळाल्याची माहिती समोर आली. गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर, कारागृह उपमहानिरीक्षक (DIG) यांच्या विशेष पथकाने थेट बीडमध्ये येऊन अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची 5 तास कसून चौकशी केली होती.

या चौकशीदरम्यान जेलर गायकवाड यांनी तीन कैद्यांना विशिष्ट धार्मिक ग्रंथांचे वाचन करण्यास सांगणे आणि प्रार्थना करण्यास भाग पाडणे, असा प्रकार समोर आला होता. तपास पथकाने गायकवाड यांच्यासह तुरुंगातील तीन कैद्यांचे जबाब नोंदवले आणि कैद्यांशी थेट संवाद साधून आरोपांची सत्यता तपासली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशी सुरू असतानाच दोन अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाल्याचेही समोर आले. या गंभीर आरोपामुळे जेलर पेट्रस गायकवाड यांच्यावर कारवाईची टांगती तलवार होती. चौकशी पथक आता या अहवालाच्या आधारे आता वादग्रस्त पेट्रस गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Exit mobile version