Download App

राज्यात कोरोनाची रिएंट्री! रुग्णांची संख्या शंभरीकडे, मुंबई-पुण्यात सर्वांधिक रुग्ण

  • Written By: Last Updated:

Corona Updates : भारतात कोरोनाचा (Corona) धोका कमी झाल्यानंतर सर्वकाही सुरळती चाललं असतांना आता पुन्हा एकदा राज्यात रिएंट्री झाली आहे. गेल्या २४ तासात राज्यात नवे २४ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढतांना दिसते. याशिवाय, राज्यात H1N1, H2N2 चे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या राज्यात ९६ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर H1N1 आणि H2N2 चे ५२ रुग्ण आढळून आले आहेत. (corona patients is increasing in the state currently 96 patients are active 24 patients were found in the last 24 hours)

ताज्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात कोरोनाचे २४ रुग्ण आढळून आले आहेत. सध्या ९६ सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. त्यात मुंबईत २८, ठाणे २५, पालघर २, रायगड ७, सिंधुदुर्ग १, पुणे २९ रुग्णांचा समावेश आहे. आज दिवसभरात ११ कोरोना रुग्णांना डिस्चार्च देण्यात आला आहे. समाधानकारक बाब अशी कोरोनामुळे आज दिवसभरात एकही मृत्यू झाला नाही. सध्या फॅटिलिटी रेट हा १.८१ टक्के इतर आहेत. तर रेकव्हरी रेट ९१.१८ टक्के आहे.

अयोध्येत राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख ठरली, पंतप्रधान मोदींना मागितला वेळ 

एकून सक्रीय रुग्णांपैकी सध्या होम आयसोलेशनमध्ये ७८ रुग्ण आहेत. तर रुग्णालयात ५ रुग्ण उपचार घेत आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ६ जुलै ते १२ जुलैच्या दरम्यान राज्यात ७१ रुग्ण होते. त्यानंतर त्यात किंचीत वाढ झाली होती. त्यामुळं पुढच्या आठवड्यात म्हणजे, १३ जुलै ते १९ जुलै दरम्यान ७५ कोरोना रुग्ण आढळले होते. २० जुलै ते २७ जुलैच्या दरम्यान ७० रुग्ण आढळले आहेत. आता यात मोठी वाढ झाली असून २७ जुलै ते २ ऑगस्ट च्या दरम्यान ९६ रुग्ण आहेत.

कोरोनाची धोका वाढत असतांना H1N1, H2N2 च्या रुग्णांचा संख्याही वाढत आहे. H1N1 च्या १ जानेवारी ते ३१ जुलै पर्यंत ६८४ केसेस आढळून आल्या होत्या. या काळात ६ रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर H2N2 चे ९५० रुग्ण आढळून आले होते. सध्या H1N1चे १५ तर H2N2 चे ३७ रुग्ण आढळून आले आहेत.

स्वाइन फ्लू H1N1, इन्फ्लुएंझा H2N2 किंवा कोरोना हे तिन्ही संसर्गजन्य रोग आहेत आणि विषाणूंद्वारे पसरतात. त्यामुळे त्याचा प्रसार झपाट्याने होण्याची शक्यता आहे. म्हणून मास्क लावून घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

 

Tags

follow us