मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात एच3 एन2 म्हणजेच एन्फ्लूएंझा या आजाराने चिंता वाढवली आहे. त्यामध्ये आता कोरोनाने देखील डोकं वर काढलं आहे. राज्यात पुन्हा कोरोना रूग्ण वाढत असल्याने सरकारने त्यासंदर्भात राज्यांना मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान रविवारी राज्यात पुन्हा कोरोना रूग्णांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.
राज्यातील कोरोना रूग्णांची रविवारी प्रसिद्ध झालेली आकडेवारी पाहायची झाल्यास गेल्या 24 तासांत राज्यात तब्बल 236 नवे कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. तर दिल्लीत देखील 72 नवे कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. त्यासंदर्भात दिल्ली आरोग्य विभागाने एक अहवाल दारी केला आहे. त्यामध्ये कोरोना संसर्गाचा दर 3.95 टक्क्यांवर पोहोचले असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. तर दिलासादायक बाब ही आहे की, यामध्ये एकाही कोरोना रूग्णाचा मृत्यू झालेला नाही.
Corona: देशात झपाट्याने पसरत असलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट XBB 1.16 ने चिंता वाढवली
दरम्यान राज्यातील कोरोना रूग्णाबद्दल सविस्तर सांगायचे झाले तर 24 तासांत राज्यात तब्बल 3834 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी सध्या राज्यात 1,308 सक्रिय कोरोना रूग्ण आहेत. गेल्या 24 तासांत राज्यात तब्बल 236 नवे कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. 92 रूग्ण बरे देखील झाले आहेत. मृत्यू दर आणि रूग्ण बरे होण्याची दर अनुक्रमे 1.82 आणि 98.16 टक्के एवढा आहे. त्यामुळे राज्य सरकारवर ताण वाढण्याची चिन्ह दिसत आहेत.
त्याचबरोबर कोविड-19 च्या 76 नमुन्यांमध्ये XBB 1.16 प्रकार आढळला आहे. अलीकडेच कोविड-19 प्रकरणांमध्ये झालेल्या वाढीमागे हा प्रकार असू शकतो. भारतीय SARS-CoV-2 जेनोमिक्स कन्सोर्टियम (INSACOG) च्या डेटामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. INSACOG हे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत कोविड-19 च्या जीनोम अनुक्रम आणि विषाणूच्या भिन्नतेचा अभ्यास आणि निरीक्षण करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले व्यासपीठ आहे. त्याची स्थापना डिसेंबर 2020 मध्ये झाली.